Join us

Palak Tiwari हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीनाही देते टक्कर, ब्रालेटमधील फोटोमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 17:12 IST

पलक तिवारी (Palak Tiwari)च्या लेटेस्ट फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) दोघेही ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असतात. नुकतेच पलक तिवारीने तिचे लेटेस्ट फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमध्ये पलक तिवारीने कलरफुल ब्रालेट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केलेला दिसतो आहे. यात ती खूपच हॉट दिसते आहे. 

पलक तिवारीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला पलक तिवारी कॅमेऱ्याच्या लेन्सला किस करताना दिसते आहे. त्यानंतर ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देताना दिसते आहे. हा व्हिडिओ समोर आला आहे. आतापर्यंत ६१००० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. छायाचित्रांमध्ये पलक तिवारीने रंगीबेरंगी ब्रालेट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. फोटो शेअर करताना पलक तिवारीने छायाचित्रकाराला श्रेयही दिले आहे.

फोटोंमध्ये पलक तिवारी हॉट पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये पलक तिवारीचे केस खुले आहेत. अनेक चाहते व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजीसह कमेंट करत आहेत. एका चाहत्याने 'वाह' लिहिले तर दुसऱ्याने 'माय ड्रीम गर्ल' असे लिहिले आहे. 

पलक तिवारी झळकली होती बिजली बिजली गाण्यातपलक तिवारी नुकतीच बिजली-बिजली या गाण्यात दिसली होती. बिजली-बिजली या गाण्याला खूपच पसंती मिळाली आहे. हे गाणे हार्डी संधूने गायले आहे. पलक तिवारी ही श्वेता तिवारीची मुलगी आहे. पलक तिवारी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून अनेकदा ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते, ज्यांना खूप पसंती मिळते.

टॅग्स :श्वेता तिवारी