कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तान दुभागले- वैचारिक मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 20:43 IST
कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तानात वैचारिक दुफळी निर्माण झाली असून महिल्यांचे निर्बंध झुगारून देऊ इच्छिणाºया महिला बलुचच्या हत्येचा निषेध करत ...
कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तान दुभागले- वैचारिक मतभेद
कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तानात वैचारिक दुफळी निर्माण झाली असून महिल्यांचे निर्बंध झुगारून देऊ इच्छिणाºया महिला बलुचच्या हत्येचा निषेध करत आहेत. तर काही मुलतत्ववादी हत्येचे समर्थन करत आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली कंदील बलुचची पाकिस्तानात तिच्याच भावाकडून हत्या करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानात दोन विचारधारा समोर येत आहेत. सोशल मीडियावरही तिच्या हत्येची प्रतिक्रिया उमटू लागील आहे. 'एक मुलगी, प्रसिद्धीसाठी विवस्त्र छायाचित्र अपलोड करते, त्या मुलीच्या भावाला काय करावे वाटेल', असे ट्विट एका मुस्लीम आधारित ट्विटरवरून करण्यात आले आहे.