Join us

‘पद्मावती’ वाद पेटला, मुंबईत १५ कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात; भन्साळींच्या घरासमोर आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 17:17 IST

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचा वाद आता पेटला असून, मुंबईत विरोध करणाºया १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात ...

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचा वाद आता पेटला असून, मुंबईत विरोध करणाºया १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अखंड राजपूताना सेवा संघाने मुंबईत तीव्र निदर्शने केली. संजय लीला भन्साळी यांच्या घरासमोर आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे राजस्थानमधील राजपूत संघटनांनी १७ नोव्हेंबरला चित्तोड किल्ला बंद करण्याची धमकी दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबईमध्ये ‘पद्मावती’ या चित्रपटाविरोधात अखंड राजपूताना सेवा संघाच्या १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यूज एजन्सी एनएनआयशी बोलताना राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रसिंग कालवी यांनी म्हटले की, ‘हा एक चित्रपट नसून इतिहास दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही चित्रपटाच्या नावावर काहीही दाखवू शकत नाही.  सूरतमध्ये राजपूत समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि करणी सेनेने मोर्चा काढून चित्रपटाला तीव्र विरोध दर्शविला होता. तर जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी दिया यांनी चित्रपटाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली होती. चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. परंतु चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता रिलीजमध्ये अडथळे तर निर्माण होणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या चित्रपटाला दिवसेंदिवस विरोध वाढत असून, कोणाकडूनही यावर तोडगा काढण्याची भाषा केली जात नाही. त्यामुळे आगामी काळात हा वाद जर जास्तच पेटला तर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक शूटिंगपासून चित्रपटाच्या भोवती वाद निर्माण झाला आहे. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शूटिंग सेटवर गोंधळ घालत मोडतोड केली होती. आता पुन्हा एकदा असेच काहीसे चित्र निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान, हा चित्रपट इतिहासकारांना दाखवावा व त्यातील योग्य ते सीन काढून टाकावेत, अशी मागणी केली जात आहे. आता हा वाद आगामी काळात काय वळण घेणार हे आताच सांगणे मुश्किल म्हणावे लागेल.