Join us  

​padmavati controversy : कधीच फ्लॉप होऊ शकत नाही ‘पद्मावती’! वाचा कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 8:57 AM

दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावती’ भलेही रिलीजपूर्वी वादात सापडला असेल पण रिलीजवर याचा जराही परिणाम होणार ...

दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावती’ भलेही रिलीजपूर्वी वादात सापडला असेल पण रिलीजवर याचा जराही परिणाम होणार नाही. खरे तर राजस्थानमधील एकही वितरक हा चित्रपट दाखवण्यास उत्सूक नाही. अनेक राज्यांत या चित्रपटाला प्रखर विरोध होत आहे. पण म्हणून या वादांमुळे संजय लीला भन्साळींचे नुकसान होईल किंवा बॉक्सआॅफिवरच्या कमाईवर परिणाम होईल, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण चित्रपटाची लागत आधीच वसूल झाली आहे. त्यामुळेच जाणकारांचे मानाल तर ‘पद्मावती’ हिट होणे निश्चित आहे.‘पद्मावती’चा एकूण बजेट १८० कोटींचा आहे. सूत्रांचे मानाल तर हे १८० कोटी आधीच वसूल झाले आहेत. कसे? तर गतवर्षी भन्साळींनी  श््रंूङ्मे18 टङ्म३्रङ्मल्ल ढ्रू३४१ी२  सोबत हातमिळवणी केली होती. ‘पद्मावती’साठी प्रॉडक्शन बजेट १५० कोटी होते तर अन्य रक्कम जाहिरातींवर खर्च केली जाणार होते. लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, १५० कोटींच्या प्रॉडक्शन बजेटपैकी ७५ कोटी वायकॉमने आपल्या निधीतून दिले आहेत. उर्वरित पैसे बँक लोनच्या रूपात आहेत. इंडस्ट्रीतील फायनान्सिअल एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटांची कमाई थिएटर, म्युझिक व सॅटेलाईट्स राईट्सवर आधारित असते. आजकाल डिजिटल अ‍ॅप्सच्या माध्यमातूनही प्रचंड कमाई होते. प्राप्त माहितीनुसार, ‘पद्मावती’चे डिजिटल स्ट्रिमिंग राईट्स अमेजन प्राईम व्हिडिओला मिळाले आहेत. २० ते २५ कोटी रूपयांत हे राईट्स विकण्यात आले आहेत. ‘पद्मावती’चे अधिकार विकून मिळालेली ही रक्कम जवळपास चित्रपटाच्या बजेटइतकी आहे. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाई करू शकला नाही तरी मेकर्सचे कुठलेही आर्थिक नुकसान होणारे नाही.ALSO READ: watch Video : रिलीजच्या तोंडावर ‘पद्मावती’ वाद सुप्रीम कोर्टात! संजय लीला भन्साळी उतरले मैदानात!!त्यातच भन्साळींनी या चित्रपटाचा १६० कोटींचा विमाही केला आहे. त्यामुळे तिकिटघरावर विरोध, तोडफोड वा वाद झालाच तर याची भरपाई विमा कंपनी करणार आहे.संजय लीला भन्साळींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ‘पद्मावती’च्या मार्गातील अडचणी दूर व्हायचे नाव घेत नाहीयेत. करणी सेना आणि राजपूत संघटनांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध चालवला असताना राजकीय पक्षांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. राजकीय गोटात चर्चित हाच वाद आता सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला आहे.