'पद्मावत' नाही 'बाजीराव मस्तानी'ही नाही तर 'या' चित्रपटाने बदलले दीपिका पादुकोणचे आयुष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 09:51 IST
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनात आपली वेगळी जागा निर्माण करणाऱ्या पद्मावती अर्थात दीपिका पादुकोणने आपल्या करिअरबाबत एक मोठा खुलासा ...
'पद्मावत' नाही 'बाजीराव मस्तानी'ही नाही तर 'या' चित्रपटाने बदलले दीपिका पादुकोणचे आयुष्य!
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनात आपली वेगळी जागा निर्माण करणाऱ्या पद्मावती अर्थात दीपिका पादुकोणने आपल्या करिअरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. दीपिकाने सांगितले तिच्या करिअरमधली अशी कोणती भूमिका होती जी वेगळी आणि आव्हानात्मक होती. दीपिकाचे फॅन्ससुद्धा हे वाचून हैराण होतील. नुकताच दीपिका पादुकोणने एका मॅगझीनला दिलेल्या इंटरव्हु दरम्यान सांगितले की, कॉकटेल हा तिच्या करिअरमधला सगळ्यात खास आणि वेगळ्या प्रकारचा चित्रपट होता. पुढे ती म्हणाली, या चित्रपटातील वेरोनिकाची भूमिता साकारण तिच्यासाठी कठिण होते. त्यामुळे कॉकटेल त्याच्यासाठी सगळ्यात खास चित्रपट आहे. कॉकटेल माझ्या करिअरमधला एक असा चित्रपट होता ज्यांने माझ्या विचारण्याच्या सगळ्या मर्यादा पार केल्या. या चित्रपटात काम केल्यानंतर मला अनेक अनुभव मिळाले. कॉकटेल केल्यानंतर माझे प्रोफेशनल विचारांमध्ये सुद्धा बदल आले. टाईम्सने जाहीर केलेल्या यादीत दीपिकाचे नाव जगातील सगळ्यात 100 प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत सामील आहे. प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा प्रमाणे दीपिकाला सुद्धा स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस खोलायचे आहे. यापूर्वी अनेकदा निर्माती बनण्याची इच्छा दीपिकाने बोलून दाखवली आहे. अलीकडे एका मुलाखतीत दीपिकाने ही इच्छा तीव्रपणे बोलून दाखवली होती. ‘मी माझे प्रॉडक्शन हाऊस उघडू इच्छिते. या माध्यमातून मला हव्या तशा विषयांवर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी हे एक्साइटींग असेल. नवे काही करण्याची संधी मला यामुळे मिळेल,’असे ती म्हणाली होती. 2015 मध्ये दिलेल्या मुलाखतीतही ती हेच बोलली होती. ALSO READ : SEE PICS : हातात हात घालून रॅम्पवर उतरलेत ‘एक्स लव्हबर्ड्स’ दीपिका पादुकोण-रणबीर कपूर!दीपिका तिच्या लग्नाच्या शॉपिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये आहे. दोघेही अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे कळतेय.