Join us

​Padmans Title Track Out : अक्षय कुमारचा संपूर्ण प्रवास फक्त एका गाण्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 13:32 IST

अक्षय कुमार नव्या वर्षात ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर अक्षयच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आज या चित्रपटाचा टायटल ट्रॅक अर्थात शीर्षक गीत रिलीज झाले.

अक्षय कुमार नव्या वर्षात ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर अक्षयच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आज या चित्रपटाचा टायटल ट्रॅक अर्थात शीर्षक गीत रिलीज झाले. अक्षयने सोशल अकाऊंटवर याची माहिती दिली. हे गाणे शेअर करताना ‘सुपरहिरो है यह पगला’ असे अक्षयने लिहिले आहे. या गाण्यातही अक्षयचा सुपरहिरो अंदाजचं पाहायला मिळतोय. एखाद्या व्यक्तिने दृढ निश्चय केला की,काय होऊ शकते, हे या गाण्यात दिसते. गाण्यात काही ठिकाणी अक्षयचा विनोदी स्वभाव झळकतो. गाण्यातील अक्षयचे संवादही लक्ष वेधून घेतात. मिका सिंहने गायलेल्या या गाण्याला अमित त्रिवेणीने संगीतबद्ध केले आहे.‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय कुमार अरूणाचलम मुरूगनाथनची भूमिका साकारताना दिसतोय. अरूणाचलम यांनी आपल्या गावातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देऊ, अशी शपथ घेतली होती. काही दिवसांपूर्वी ‘पॅडमॅन’चा ट्रेलर आऊट झाला होता. ‘सुपरहिरो है ये पगला’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ALSO READ : Padman song Aaj Se Teri: !! पाहा, अक्षय कुमार - राधिका आपटेचा रोमॅन्टिक अंदाज!अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिरवणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील याच पठडीतला चित्रपट आहे. यापूर्वी अक्षय ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटही असाच  सामाजिक विषयाला वाहिलेला होता.