Join us

Oscars 2025: 'लापता लेडीज' बाहेर पण ऑस्करच्या पुढील फेरीत गेलेल्या 'या' हिंदी सिनेमाची चर्चा! काय आहे कहाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:03 IST

'लापता लेडीज' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर गेलाय. परंतु एक हिंदी सिनेमा ऑस्करच्या पुढच्या फेरीत गेल्याने भारताच्या आशा अजूनही कायम आहेत

ऑस्कर २०२५ ची सध्या चांगलीच चर्चा आहे. ऑस्कर २०२५ सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. आंतरराष्ट्रीय सिनेमा जगतातील मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून 'ऑस्कर'ला ओळखलं जातं. ऑस्कर २०२५ साठी यंदा भारतातर्फे 'लापता लेडीज' (lost ladies) हा सिनेमा पाठवला गेला होता. परंतु हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर गेला. लापता लेडीज ऑस्करमधून बाहेर गेला असला पण एका हिंदी सिनेमाने ऑस्करच्या पुढील शर्यतीत प्रवेश मिळवला आहे. या सिनेमाचं नाव 'संतोष'. (santosh)

काय आहे 'संतोष' सिनेमाची कहाणी?

'संतोष' सिनेमात एका २८ वर्षीय विधवा महिलेची कहाणी दिसते. पतीच्या मृत्यूनंतर त्या महिलेला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळते. हा प्रवास त्या महिला कॉन्स्टेबलसाठी नक्कीच सोपा नसतो. तिला एका युवा तरुणीच्या हत्येच्या केसचा तपास करण्याची संधी मिळते. त्यावेळी ती महिला कॉन्स्टेबलला या हत्येचा तपास करताना काय आव्हानं येतात? याची कहाणी 'संतोष' सिनेमात बघायला मिळते. अभिनेत्री शहाना गोस्वामीने 'संतोष' सिनेमात प्रमुख भूमिका साकारली आहे.

'संतोष' सिनेमाबद्दल आणखी काही

युनायटेड किंगडमद्वारे ऑस्कर्स २०२५ साठी 'संतोष' हा हिंदी सिनेमा पाठवण्यात आलाय. आता हा सिनेमा ऑस्करच्या पुढील फेरीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. ब्रिटीश इंडियन फिल्ममेकर संध्या सुरी यांनी संतोष सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. आता पुढच्या राऊंडमध्ये असलेल्या १५ सिनेमांमधून संतोष सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळेल का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. मार्च महिन्यात ऑस्कर २०२५ पुरस्कारांचं वितरण पार पडणार आहे.

 

टॅग्स :ऑस्करऑस्कर नामांकनेकिरण राव