Join us  

Oscar Awards 2020 : प्रियंकाला मिळाले नाही ऑस्करचे आमंत्रण? सोशल मीडियावर मांडली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 11:54 AM

यंदाच्या ऑस्करमध्ये प्रियंका सहभागी होऊ शकली नाही.त्यामुळे तिने सोशल मीडियावरच तिच्या चाहत्यांना ती या सोहळ्यात उपस्थित नसल्याची आठवण करून दिली.

यंदाच्या ऑस्कर अवॉर्डसला दणक्यात  संपन्न झाला. यातच बॉलिवूडची एक अभिनेत्री चर्चेत आली. ही दुसरी तिसरी अभिनेत्री नसून ती आहे बॉलिवूडची पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्रा. यंदाच्या ऑस्करमध्ये प्रियंका सहभागी होऊ शकली नाही.त्यामुळे तिने सोशल मीडियावरच तिच्या चाहत्यांना ती या सोहळ्यात उपस्थित नसल्याची आठवण करून दिली. तिने पोस्ट शेअर करत म्हटले की, यंदाचा ऑस्कर सोहळा मी तुमच्याबरोबर पाहणार आहे. तसेच या अवॉर्डस संदर्भात चाहत्यांना ती प्रश्न विचारत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह दिसत आहे. प्रियंका इथवरच नाही थांबली तर तिने या सोहळ्यातील तिचे जुने फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 2016 पासून प्रियंका आवर्जुन ऑस्करला उपस्थित असायची. त्यामुळे तिथले काही खास फोटो तिने शेअर करत तिच्या चाहत्यांना एक ट्रीटच दिल्याचे तिने म्हटले आहे.

'स्काई इज पिंक' सिनेमानंतर बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा हिने आगामी प्रोजेक्टचा खुलासा केला नव्हता. मात्र आता अशी माहिती मिळतेय की प्रियंका चोप्राला आणखीन एका हॉलिवूडचा प्रोजेक्ट मिळाला आहे.  प्रियंका चोप्रा हॉलिवूडचा सिनेमा 'मॅट्रिक्स'च्या चौथ्या भागात दिसू शकते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका व निर्मात्यांमध्ये या संदर्भात बातचीत सुरू आहे.

 

 

आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. जर सर्व काही ठीक असेल तर लवकरच देसी गर्ल या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. मागील काही आठवड्यांपासून 'मॅट्रिक्स ४'मधील कलाकार ट्रेनिंग घेत आहे. असे वृत्त आहे की लवकरच नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राऑस्कर