Join us  

प्रिया प्रकाश वारियरबद्दल दिग्दर्शकाने केला धक्कादायक खुलासा, वाचाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 3:57 PM

आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘ओरू अदार लव’ या डेब्यू चित्रपटातील ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले.

ठळक मुद्देमध्यंतरी स्वत: नूरिन शरीफ  हिनेही प्रियामुळे तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता.

आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘ओरू अदार लव’ या डेब्यू चित्रपटातील ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले. प्रिया एका रात्रीत स्टार झाली. अगदी ‘नॅशनल क्रश’ बनली. या व्हिडीओनंतर प्रियाच्या आयुष्यानेही कलाटणी घेतली. कदाचित म्हणूनच ‘ओरू अदार लव’मध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून साईन करण्यात आले असताना अचानक तिला या चित्रपटात मुख्य नायिका बनवले गेले. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. ‘ओरू अदार लव’चे दिग्दर्शक ओमर लुलू यांनी तशी कबुली दिली आहे.

एका मुलाखतीत ओमर लूलू यांनी सांगितले की, प्रियाचा व्हिडीओ सुपरहिट झाल्यानंतर ‘ओरू अदार लव’ या चित्रपटावर सगळ्यांच्या नजरा टिकल्या. आता हा चित्रपट आणखी जबरदस्त व्हायला हवा, असे मला वाटते. मी निर्मात्यांना तसे बोलूनही दाखवले. पण अचानक निर्मात्यांनी प्रियाला लीड हिरोईन करून टाका, असे फर्मान सोडले. त्याच्या निर्देशानंतर संपूर्ण चित्रपटात प्रियाला हायलाईट करण्यात आले. आधी चित्रपटाची कथा वेगळी होती. पण प्रियासाठी अख्खी थीम बदलली गेली. चित्रपटात नूरिन शरीफ ही आणखी एक अभिनेत्री होती. ती प्रियापेक्षा काकणभर सरस होती. तिचा अभिनयही प्रियापेक्षा दमदार होता. 

मध्यंतरी स्वत: नूरिन शरीफ  हिनेही प्रियामुळे तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता. मला या चित्रपटासाठी लीड हिरोईन म्हणून साईन करण्यात आले होते. मी आनंदात होते. पण प्रियाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिच्यासाठी अख्खी स्टोरी बदलली गेली. मला दूर फेकले गेले. माझी भूमिका कापण्यात आली, असे तिने म्हटले होते.

टॅग्स :प्रिया वारियर