Join us

‘इंडियाज फायनेस्ट फिल्म्स’मध्ये पाहाता येणार ‘ओंकारा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 11:48 IST

‘ओंकारा’ चित्रपटाची कथा नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या ‘ऑथेल्लो’ या नाटकावर आधारित असून आपल्या विश्वासघातकी मदतनीसावर अंध विश्वास टाकून आपल्या ...

‘ओंकारा’ चित्रपटाची कथा नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या ‘ऑथेल्लो’ या नाटकावर आधारित असून आपल्या विश्वासघातकी मदतनीसावर अंध विश्वास टाकून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणा-या एका दिशाभूल झालेल्या गुंड दादाची कथा यात सादर करण्यात आली आहे.कुमार मंगत पाठक यांची निर्मिती असलेल्या याचित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे.अजय देवगण, करिना कपूर आणि सैफ अली खान हे यात प्रमुख भूमिकेत असून विवेक ओबेरॉय, नासिरुद्दिन शहा, कोंकोना सेन-शर्मा, बिपाशा बसू यांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.आपल्या ‘वो जमाना, करें दीवाना’ या ध्येयास अनुसरून ‘झी क्लासिक’ वाहिनी शुक्रवार, 6 एप्रिल रोजी रात्री 10.00 वाजता आपल्या ‘इंडियाज फायनेस्ट फिल्म्स’ मालिकेत ‘ओंकारा’ चित्रपटाचे प्रसारण करणार आहे.डॉली (करिना कपूर) ही ओंकारा शुक्ला (अजय देवगण) याच्या आकंठ प्रेमात बुडालेली असली, तरी तिचे वडील अ‍ॅडव्होकेट रघुनाथ मिश्रा (कमल तिवारी) हे तिचा विवाह बळजबरीने राजन (दीपक दोब्रियाल) याच्याशी लावतात. पण लग्नाच्या दिवशीच वराकडच्या लोकांवर हल्ला होतो आणि डॉलीचे अपहरण केले जाते. डॉलीला ओंकाराबरोबर पाहिल्यावर तिचे वडील संतप्त होतात.रघुनाथ आणि ओंकारा यांच्यात शाब्दिक खडाजंगी होते, पण भाईसाहेब (नासिरुद्दिन शहा) हा राजकीय नेता त्यात हस्तक्षेप करतो.पण डॉलीचे अपहरण झाले नसून ती स्वखुशीनेच ओंकाराकडे गेल्याचेही नंतर निष्पन्न होते.यानंतर रघुनाथ ओंकाराला धमकी देऊन तिथून निघून जातो.लवकरच भाईसाहेबला गोळी लागते आणि तो जखमी होतो, तेव्हा तो ओंकारालाच आपला उत्तराधिकारी घोषित करतो.ओंकारा आपला भाऊ केशव (विवेक ओबेरॉय) याची आपला विश्वासू अधिकारी म्हणून नियुक्ती करतो.ही गोष्ट ईश्वर ‘लंगडा’ त्यागीला (सैफ अलीखान) अजिबात मान्य होत नाही. यानंतर त्यागीकडून सत्ता मिळविण्याचे कुटिल कारस्थान सुरू होते, ज्यात अनेकांचा बळी पडतो.या कुटिल कारस्थानाचा खरा सूत्रधार कोण असतो आणि हे सत्य ओंकाराला शेवटी कळते की नाही? ओंकारा आणि डॉलीच्या प्रेमकथेचे पुढे काय होते,हे पाहणे रंजक ठरणार आहे.