Join us  

OMG! विकी कौशलने सलमान खान समोरच केले कतरिना कैफला प्रपोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 5:48 PM

या व्हिडिओत विकी सलमानसमोरच कतरिनाला प्रपोज करताना दिसत आहे.

ठळक मुद्देहा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनमधील आहे. ज्यात विकी कतरिनाला म्हणतो, लग्नाचा सीझन सुरू आहे तर तू एखाद्या विकी कौशलला बघून लग्न का करून टाकत नाही. मी तर तुला विचारतो की, माझ्याशी लग्न करशील का?

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे अफेअर असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगली आहे. पण यावर त्या दोघांनी मौन राखणेच पसंत केले आहे तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी कतरिना कैफ आणि सलमान खानचे अफेअर होते. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले जात असे. ते दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत असताना त्यांचे ब्रेकअप झाले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सलमानच्या समोरच विकी कौशल सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिनासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे आणि हे पाहिल्यावर सलमान खान अशी रिअ‍ॅक्शन देतो की त्याच्या याच रिअ‍ॅक्शनमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे.

हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनमधील आहे. ज्यात विकी कतरिनाला म्हणतो, लग्नाचा सीझन सुरू आहे तर तू एखाद्या विकी कौशलला बघून लग्न का करून टाकत नाही. माझ्याशी लग्न करशील का? विकीला असं फ्लर्ट करताना पाहून सलमानला सुद्धा हसू आवरत नाही. विकीचं बोलणं ऐकून तो बाजूला बसलेल्या अर्पिता खानच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपण्याचं नाटक करतो. सलमानचा हा व्हिडीओ त्यावेळी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अनेकवेळा कॅट आणि विकी एकत्र स्पॉट होतात. न्यू इअरच्या निमित्ताने कतरिना कैफने एक फोटो शेअर केला होता. ज्यात विकी कौशलचे प्रतिबिंब आरशात दिसले होते. त्यानंतर कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कतरिनासोबत आणखी कुणी तरी होते. मात्र या व्यक्तीचा चेहरा फोटोत दिसत नव्हता. मात्र या फोटोत कतरिना कैफ विक्की कौशलला मिठी मारत असल्याचे अभिनेत्रीच्या चाहत्यांचे म्हणणे होते आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे पुरावे देखील दिले होते.

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफविकी कौशल