Join us  

OMG ! सुशांत सिंग राजपूतने आपला ड्रीम प्रोजेक्ट 'चंदा मामा दूर के'मधून घेतली एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 10:44 AM

सुशांत सिंग राजपूतचा ड्रीम प्रोजेक्ट 'चंदा मामा दूर के'मधून अखेर त्याने एक्झिट घेतली आहे. सुशांतने स्वत: या सिनेमाची घोषणा केली होती.

ठळक मुद्देआता या प्रोजेक्टचे काम सुरु होणार होते त्यावेळी सुशांतने हातवर केले आहेत.

सुशांत सिंग राजपूतचा ड्रीम प्रोजेक्ट 'चंदा मामा दूर के'मधून अखेर त्याने एक्झिट घेतली आहे. सुशांतने स्वत: या सिनेमाची घोषणा केली होती. तसेच त्याने या सिनेमासाठीची तयारी देखील सुरु केली होती. ज्यासाठी तो ट्रेनिंग घ्यायला नासाला देखील गेला होता. त्यानंतर सुशांतचे नासामधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले होते. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार सुशांत आता हा सिनेमा करत नाहीय. सुशांतने हा सिनेमा करण्यास नकार दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा फाइनेंसर्स न मिळाल्यामुळे रखडला होता. आता या प्रोजेक्टचे काम सुरु होणार होते त्यावेळी सुशांतने हातवर केले आहेत. याला कारण आहे यासिनेमाच्या शूटिंगच्या सतत बदलत्या तारखा. यामुळे सुशांत हैराण झाला होता. त्याला त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टवर देखील काम करायचे आहे त्यामुळे 'चंदा मामा दूर के'च्या मेकर्ससोबत त्यांचे टाईमटेबल मॅच होत नाहीय.  

सिनेमाचे दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान मुंबई मिररशी बोलताना म्हणाले की, सुशांतने जरी हा प्रोजेक्ट सोडला असला तरी त्याच्या आणि माझ्यात काही मतभेद नाहीत. मला विश्वास आहे की तो उत्तम अभिनेत्यासोबत चांगला दिग्दर्शक ही बनेल.   

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की सुशांत चंद्रावर जमिन खरेदी केली आहे. चंद्रावर Mare Muscoviense वा Sea of Muscovy  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात मी जमिनीचा तुकडा खरेदी केला असल्याचे खुद्द सुशांतनेच या मुलाखतीत सांगितले. सुशांतने इंटरनॅशनल लुनार लँड रजिस्ट्रीकडून चंद्रावरची  खरेदी केली आहे. याचसोबत चंद्रावर जमीन खरेदी करणारा सुशांत पहिला बॉलिवूड सेलिब्रिटी बनला आहे. त्यामुळे चंदा मामा दूर के मधून जरी सुशांतने एक्झिट घेतली असली तरी  सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी बनू शकतो. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत