OMG ! सनी लिओनी शाहरूखसोबत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 09:55 IST
होय...ग्लॅमडॉल, हॉट गर्ल सनी लिओनी शाहरूखसोबत दिसणार आहे. आमीर खान सोबत काम करण्याचे स्वप्न असल्याचे सनीने यापूर्वी बोलून दाखवले ...
OMG ! सनी लिओनी शाहरूखसोबत!!
होय...ग्लॅमडॉल, हॉट गर्ल सनी लिओनी शाहरूखसोबत दिसणार आहे. आमीर खान सोबत काम करण्याचे स्वप्न असल्याचे सनीने यापूर्वी बोलून दाखवले होते. आमीरनेही ‘मलाही सनीसोबत काम करायला आवडेल, अशा शब्दांत सनीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता आमीरसोबत काम करण्याची सनीची स्वप्नपूर्ती कधी होते, ते आपण बघूच..पण तत्पूर्वी सनीने किंगखान शाहरूखसोबत संधी मिळाली आहे. शाहरूखच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटात सनीचे एक आयटम साँग असल्याची खबर आहे. या सॉंगमध्ये सनीसोबत शाहरूखही थिरकणार असल्याची बातमी आहे...ही खबर खरी असेल तर निश्चितपणे एका ‘खान’सोबत काम करण्याचे ग्लॅमडॉलचे स्वप्न साकार झाले म्हणायचे....