Join us

OMG : ​‘या’ कारणाने आठवडाभर झोपू शकली नव्हती सनी लिओनी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 10:38 IST

पॉर्नस्टार आणि बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीने जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'जेट एअरवेजच्या विमानांची ...

पॉर्नस्टार आणि बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीने जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं रोजच उशिरा होत असल्यामुळं आम्हाला मागील आठवड्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. जेटच्या गोंधळामुळं आठवडाभर माझी झोपही पूर्ण होऊ शकली नाही,' असा त्रागा सनीनं व्यक्त केलाय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिलीय. 'जेट एअरवेजची विमानं जवळपास रोजच उशिरानं उडत आहेत. गेला आठवडाभर मी जेटच्या विमानांनी प्रवास करतेय आणि रोजच माज्या विमानाचं उड्डाण किमान तासभर उशिरानं होतंय. एखाद्या दिवशी हे घडलं असतं तर ठीक होतं. पण गेला आठवडाभर रोजच हे सुरू आहे. त्यामुळं मला धड झोपही घेता आलेली नाही,' असं ट्विट सनीनं केलंय. सनी आणि डॅनिअल यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली, मुंबई व अहमदाबादेतून जेटच्या विमानांनी प्रवास केला. त्यांनी चारवेळा जेटची फ्लाइट पकडली. पण चारही वेळा उड्डाणांना सुमारे तासभर उशीर झाला. त्यामुळं ते नाराज झाले. सनीचा पती डॅनिअलनं जेटच्या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. आठवड्याभरात चार विमानांना उशीर झाल्याचं डॅनिअलनं जेटच्या कस्टमर केअरला कळवलं. त्यावर ही चूक एअरलाइन्सची नसून विमानतळ प्रशासनाची आहे, असं उत्तर त्याला देण्यात आलं. त्यामुळं तोही चकित झाला. जेटचं हे उत्तर हास्यास्पद असल्याचं त्यानं म्हटलं आहे. बॉलिवूडची लैला सनी लिओनी हिला कोणी ओळखत नसेल असे क्वचितच म्हणावे लागेल. कारण आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची सनसनी बनली आहे. विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे. त्यामुळेच कदाचित तिच्यावर अशाप्रकारच्या कॉमेण्ट्स केल्या जातात की, सनी बॉलिवूड चित्रपटांना पोर्न चित्रपटांकडे घेऊन जात आहे.}}}}