Join us  

OMG !! नेहा कक्कड व हिमांश कोहली यांचे ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 10:52 AM

होय, नेहा व हिमांश यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरात आहेत. या चर्चेला तोंड फुटण्याचे कारण म्हणजे, नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ केले आहे.

ठळक मुद्दे‘इंडियन आयडॉल 10’मध्ये ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नेहाला आश्चयार्चा सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि ती वेड्यासारखी हसत होती.

‘यारियां’ फेम अभिनेता हिमांश कोहली आणि बॉलिवूडची लोकप्रीय गायिका नेहा कक्कड यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजच्या नाहीत. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. अगदी अलीकडे ‘इंडियन आयडॉल 10’च्या सेटवर नेहा व हिमांश या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. पण आता वेगळीच चर्चा आहे. होय, नेहा व हिमांश यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरात आहेत. या चर्चेला तोंड फुटण्याचे कारण म्हणजे, नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ केले आहे. केवळ इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे स्वत:चे सर्व व्हिडिओ व फोटो आपल्या सोशल अकाऊंटवरून डिलिट केले आहेत. आता दोघांमध्येही काय मतभेद झालेत, हे तर त्यांनाच ठाऊक. नेहा व हिमांश दोघेही ‘ओह हमसफर’ या व्हिडिओत एकत्र दिसले होते.

‘इंडियन आयडॉल 10’मध्ये ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नेहाला आश्चयार्चा सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि ती वेड्यासारखी हसत होती.

माझ्यासाठी हिमांश फक्त मित्र नाही तर त्यापेक्षा जास्त आहे.  जगात हिमांश इतक्या चांगल्याप्रकारे तिला अन्य कोणी समजून घेत नाही आणि ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे.हिमांश इतक्या चांगल्या प्रकारे मला कोणीच ओळखत नाही. मी फक्त त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार करू शकते. मी त्याच्या चित्रपटासाठी ‘आज ब्लू है पानी पानी’ हे गीत म्हटले होते, त्यावेळी मी हिमांशला सर्वप्रथम भेटले होते. त्या दिवसापासून आमचा झालेला हा प्रवास खूप सुंदर होता, ज्याच्या अनेक गोड आठवणी आहेत, असे नेहा यावेळी म्हणाली होती. हिमांशनेही नेहावरील प्रेमाची कबुली दिली होती. ‘प्रेम नेहमी मैत्रीपासून सुरू होते आणि नेहा माझ्यासाठी मैत्रिणीपेक्षा जास्त आहे. तिच्याकडून ही कबुली ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो आणि मला वाटते आजच तो दिवस आहे,’असे तो म्हणाला होता.

टॅग्स :नेहा कक्करहिमांश कोहली