Join us

OMG : शाहरूख खानची मुलगी सुहानाच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 18:30 IST

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिझी आहे. अशातही दोन दिवसांपूर्वी ...

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिझी आहे. अशातही दोन दिवसांपूर्वी तो मुलगी सुहानासोबत मुंबई येथील अर्थ रेस्टॉरेंटच्या ग्रॅण्ड ओपनिंगसाठी उपस्थित राहिला होता. मात्र यावेळी शाहरूखपेक्षा सुहानाकडेच सर्वांच्या नजरा खिळल्याने सुहाना सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. कारण यावेळी सुहानाचा लुक इंप्रेस करणारा होता. सुहानाचा ड्रेस बघून उपस्थित शाहरूखला विसरले होते. सुहाना यावेळी एक परफेक्ट होस्ट म्हणून बघावयास मिळाली. सुहानाचा अंदाज असा काही होता की, बॉलिवूडमध्ये एंट्री करू इच्छित असलेल्या स्टार किड्सलाही तिने मात दिली होती. आॅरेंज कलरच्या ड्रेसमध्ये सुहानाचे रूप चांगलेच खुलले होते. मात्र या ड्रेसची किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सुहानाने परिधान केलेला हा ड्रेस बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या सॅकडों टॉपच्या बरोबरीचा आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. कारण या ड्रेसची किंमत ६०,००० रुपये आहे. सुहाना सध्या १७ वर्षांची आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा तिचा सध्या कुठलाही विचार नाही. सध्या ती शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आहे. अशातही सुहानाला एवढा महागडा ड्रेस आश्चर्यचकीत करणारा आहे. कारण बॉलिवूडमधील मोठ्या स्टार अभिनेत्रीदेखील हा ड्रेस परिधान करताना चार वेळा विचार करतात. काही दिवसांपूर्वीच दीपिका एका पार्टीत बघावयास मिळाली होती. यावेळी तिने केवळ तीनशे रुपयांचा टॉप परिधान केला होता. दरम्यान, या कार्यक्रमासाठी सुहाना पप्पा शाहरूख खानसोबत आली होती. एका शानदार कारमधून उतरताच सुहानाची एक झलक टिपण्यासाठी शेकडो कॅमेरे तिच्याकडे वळाले होते. ब्लॅक शर्ट आणि पॅण्टमध्ये असलेल्या शाहरूखचा लुक सुहानाच्या लुकसमोर काहीसा फिका पडला होता. सुहानाकडे बघून ती आगामी काळात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असेल असे जाणवले नसेल तरच नवल.