OMG ! आदित्य रॉय कपूरमुळे झाले रणवीर सिंहचे ‘ब्रेकअप’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 12:48 IST
अभिनेता रणवीर सिंहचे नाव बॉलिवूडच्या टॉप अॅक्टर्समध्ये घेतले जाते. आदित्य चोप्राने काही दिवसांपूर्वी म्हटले होतेच की, रणवीर सिंह बॉलिवूडचा ...
OMG ! आदित्य रॉय कपूरमुळे झाले रणवीर सिंहचे ‘ब्रेकअप’!!
अभिनेता रणवीर सिंहचे नाव बॉलिवूडच्या टॉप अॅक्टर्समध्ये घेतले जाते. आदित्य चोप्राने काही दिवसांपूर्वी म्हटले होतेच की, रणवीर सिंह बॉलिवूडचा पुढचा शाहरूख खान आहे. बॉलिवूडच्या या ‘बाजीराव’वर आज हजारो तरूणी मरतात. बड्या बड्या अभिनेत्री त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला तयार आहेत. पण काही वर्षे मागे गेल्यास तुम्हाला काही वेगळेच दिसेल. होय, आज रणवीरवर हजारो मुली मरत असल्या तरी, काही वर्षांपूर्वी म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्याच्या गर्लफ्रेन्डने दुसºया एका मुलासाठी रणवीरला सोडले होते. हा दुसरा मुलगा म्हणजे कोण माहितीयं? हा दुसरा मुलगा दुसरा कुणी नसून अभिनेता आदित्य रॉय कपूर आहे. म्हणजेच आदित्य रॉय कपूरसाठी रणवीरच्या गर्लफ्रेन्डने रणवीरला सोडले होते. अलीकडे नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये खुद्द रणवीरनेच हे सांगितले. या शोमध्ये येणारा प्रत्येक सेलिब्रिटी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या आयुष्यातील अनेक रहस्ये सांगतात. रणवीरनेही हेच केले. त्याने आपल्या कॉलेज लाईफमधील काही रहस्ये उघड केली. त्याने सांगितले की, ज्युनिअर कॉलेजमध्ये आदित्य रॉय कपूरवर सगळ्या मुली भाळायच्या. मी कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर अक्षरश: मरायचो. अर्थात आता तिचे लग्न झालेयं व ती एका बाळाची आई आहे. पण आम्ही बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. पण आदित्य रॉय कपूर मध्ये आला अन् तिने मला सोडले.आता रणवीरने त्या गर्लफ्रेन्डचे नाव सांगितले नाही. पण कदाचित रणवीरच्या या गोष्टी सुपरस्टार धर्मेन्द्रची मुलगी अहाना देओलकडे इशारा करणाºया आहेत. कारण, अहाना देओल कॉलेजच्या दिवसांत रणवीर सिंह व आदित्य रॉय कपूर या दोघांना डेट करून चुकली आहे. २०१४मध्ये अहानाने वैभव अरोरासोबत लग्न केले. तिला दोन वर्षाचा मुलगा आहे. आता याऊपर काय खरे, ते रणवीरलाच माहित!!