बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहेत. तिचे जगभरात खूप चाहते आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने अमेरिकेत स्वतःचे भारतीय रेस्टॉरंट सुरू केले आहे. न्यूयॉर्क शहरात असलेल्या या रेस्टॉरंटचे नाव आहे सोना. या रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डवर भारतीय पदार्थांची मोठी यादी पहायला मिळेल. यात पानीपुरी, डोसा, कुल्चा या सारख्या पदार्थांचा समावेश आहे. मात्र आता प्रियांका पुन्हा एकदा रेस्टॉरंटमधील एका मेन्यूमुळे चर्चेत आली आहे. हा पदार्थ म्हणजे मुंबईचा वडापाव.
हो. खरं आहे. प्रियंका चोप्राच्या सोना रेस्टॉरंटमध्ये वडापावदेखील मिळतो. मात्र एका वडापावची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल. या वडापावची किंमत १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात साधारण १ हजार रुपये इतकी आहे. मुंबईमध्ये सर्वांचा आवडीचा असणारा वडापाव आता सातासमुद्रापार जाऊन प्रियांकाच्या उपहारगृहाद्वारे अमेरिकेच्या लोकांच्या मनावरही राज्य करत आहे.