Join us  

OMG! रणवीर सिंगचा अवतार पाहताच रडायला लागली चिमुकली, व्हायरल झाला व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:48 PM

नुकताच रणवीर चित्रविचित्र कपड्यात दिसला. त्याचा हा अतरंगी अवतार चाहत्यांनी तर पचवला. पण एक चिमुकली रणवीरचा अवतार पाहून इतकी घाबरली की, रडायला लागली. 

ठळक मुद्दे रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.  या सिनेमात तो माजी क्रिकेटपटू  आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

सर्वांचा लाडका अभिनेता रणवीर सिंग याच्या अभिनयाला तोड नाही. तशीच त्याच्या फॅशनलाही सीमा नाही. होय, रणवीर अभिनयाइतकाच त्याच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याचे चित्रविचित्र कपडे, त्याची फॅशन सगळेच लक्षवेधी ठरते. अनेकदा यावरून तो ट्रोलही होतो. पण या ट्रोलिंगची पर्वा करेल तो रणवीर कुठला. नुकताच रणवीर अशाच चित्रविचित्र कपड्यात दिसला. त्याचा हा अतरंगी अवतार चाहत्यांनी तर पचवला. पण एक चिमुकली रणवीरचा अवतार पाहून इतकी घाबरली की, रडायला लागली. 

लाल रंगाचा झब्बा आणि जीन्स, डोळ्यावर गॉगल अशा अवतारात रणवीर एका रेकॉर्डिंग स्टुडिओमधून बाहेर पडला. रणवीर दिसताच फॅन्सनी त्याला गराडा घातला. एक बाबा आपल्या लेकीला कडेवर यावेळी उभा होता. रणवीर जवळ येताच त्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण रणवीरचा अवतार पाहून बाबाच्या कडेवरची चिमुकली आपल्या बाबाला बिलगली आणि रडू लागली.

 रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.  या सिनेमात तो माजी क्रिकेटपटू  आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता जीवा हा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका साकारणार आहे तर अभिनेता साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच मराठी अभिनेता चिराग पाटील, मान सिंग, पंकज त्रिपाठी, ताहिर भसीन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

 

टॅग्स :रणवीर सिंग