Join us

OMG! ​कंगनाला लग्नाआधीच व्हायचेय आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:35 IST

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली कंगना रानौतने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. एका मुलाखती दरम्यान कंगनाने आता मला ...

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली कंगना रानौतने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. एका मुलाखती दरम्यान कंगनाने आता मला आई होण्याची इच्छा होत असल्याचे सांगितले. ही योग्य वेळ असून असे व्हावे असेही ती म्हणाली.कंगना म्हणाली, मी सध्या पूर्णत: आत्मनिर्भर आहे. पण, जेव्हा तुमचे वय ३० वर्षांच्या आसपास असते त्यावेळी तुमच्या मनात आई होण्याची भावना वाढीस लागते आणि तुम्ही मुलांच्या जन्माबद्दल विचार करू लागता. कंगना आपल्या या मतावर खुलासा करताना म्हणाली, मला हे कधीच वाटले नव्हते की मी असे कधी कुणाला सांगेन. मात्र, मला आता वाटू लागले आहेत की हीच वेळ आहे आणि मी हे शेअर केलेच पाहिजे. मला वाटते असे लवकरच व्हावे. कंगना सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. कंगनाने एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये घेते. लवकरच तिचा विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ व हंसल मेहता यांचा ‘सिमरन’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय पुढील वर्षी ‘राणी लक्ष्मी बाई’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहता करणार आहेत. यात ती ‘झाशीची राणी वीरांगणा लक्ष्मी बाई’ या भूमिकेत दिसणार आहे. रंगूनचे प्रोडक्शनचे काम संपले असून लवकर हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. कंगनाने दोन दिवसांपूर्वी हृतिक रोशन सोबतच्या संबंधांचा खुलासा करताना एक कविता म्हणून दाखविली होती व एक रूपक कथेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मला नग्ण झाल्यासारखे वाटत होते असेही ती म्हणाली होती.