Join us  

बापरे..! लग्नाआधी अक्षय कुमारला 'गे' समजायची ही व्यक्ती, वाचा हा मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 3:41 PM

अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून  यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याचा हा मजेशीर किस्सा

अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म पंजाबमधील आहे. त्याचे खरे नाव राजीव भाटिया असून त्याचे शिक्षण हे मुंबईत झाले आहे. त्याने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मॅरिटल आर्टचे शिक्षण घेतले असून त्याने वेटर म्हणून थायलंडमधील एका हॉटेलमध्ये नोकरी देखील केली आहे. तसेच त्याने कोलकातामधील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केले आहे. पण मुंबईत परतल्यावर त्याने मॉडलिंग करायला सुरुवात केली आणि मॉडलिंगमुळे केवळ दोन दिवसांत त्याला तो महिन्याला कमावत असलेल्या पगाराइतका पैसा मिळाला आणि त्याने मॉडलिंगमध्येच करियर करण्याचा विचार केला.

मॉडलिंग करत असताना त्याला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आणि सौगंध या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या खिलाडी या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आजवर रुस्तम, एअरलिफ्ट, रावडी राठोड, वेलकम, ओह माय गॉड, हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

Birthday Special: अक्षय कुमारच्या रिअल लाइफमधील आतापर्यंत न पाहिलेले फोटो, See Photos

Akshay Kumar Birthday: 16 फ्लॉप सिनेमे तरीदेखील अक्षय कुमार आज आहे बॉलिवूडमधील सुपरस्टार

वैयक्तिक जीवनातही अक्षय एक उत्तम आणि आदर्श पती आहे.अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे.दोघांचंही एकमेंकांवर जीवापाड प्रेम आहे.मात्र दोघांचं हे नातं निर्माण होण्याआधी त्याला अक्षय कुमारची सासू आणि प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी विरोध केला होता.या विरोधाचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.या कारणाचा खुलासा खुद्द अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने केला आहे.

अक्षय कुमारच्या बाबतीतील मजेशीर गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे त्याची सासू म्हणजे ट्विंकल खन्नाची आई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा आणि त्यांनी त्यांच्या मुलीला सल्लादेखील दिला होता. एका शोमध्ये काही वर्षांपूर्वी ट्विंकल खन्नाने सांगितलं होतं की, तिच्या आईला अक्षय कुमार गे असल्याचं वाटत होतं. त्यामुळे आमचं लग्न होऊ नये असं त्यांना वाटत होतं. ट्विंकलला प्रपोज केल्यानंतर जेव्हा तिने आईला अक्षयने लग्नासाठी मागणी घातल्याचं सांगितलं तेव्हा त्या चकीत झाल्या.

ट्विंकल खन्नाला एका पत्रकार मित्रानं सांगितलं होतं की अक्षय गे आहे. डिंपल कपाडियाने मुलीला सल्ला दिला की तू व अक्षय एक वर्ष एकत्र रहा आणि मग पुढे काय करायचं ते ठरवा.

ट्विंकलने आपल्या आईला म्हणजेच डिंपलला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र डिंपल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ही सगळी बाब ट्विंकलच्या वडिलांना म्हणजेच सुपरस्टार राजेश खन्ना यांनी समजली. या सगळ्या तिढ्यात त्यांनी मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर तोडगा म्हणून राजेश खन्ना यांनी अक्षय आणि ट्विंकल यांना लग्नाआधी वर्षभर एकत्र राहण्याचा सल्ला दिला.

यानंतर अक्षय आणि ट्विंकल वर्षभर एकत्र राहिले. त्यानंतर डिंपलला खात्री पटली की अक्षय कुमार गे नाही आणि लेकीचं लग्न त्यांनी खिलाडी कुमारशी मोठ्या आनंदात लावून दिलं.

टॅग्स :अक्षय कुमारडिम्पल कपाडियाट्विंकल खन्ना