Join us

​OMG!! कपिल शर्माचा शो सोडून गेल्याने दादी, चंदू आणि डॉक्टर गुलाटीचे झाले लाखोंचे नुकसान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 11:23 IST

कपिल शर्मासोबत सुनील ग्रोवरचे विमानात भांडण झाले आणि मग सुनील कपिलच्या शोमधून बाहेर पडला. पाठोपाठ ‘दादी’ची भूमिका साकारणारा अली ...

कपिल शर्मासोबत सुनील ग्रोवरचे विमानात भांडण झाले आणि मग सुनील कपिलच्या शोमधून बाहेर पडला. पाठोपाठ ‘दादी’ची भूमिका साकारणारा अली असगर आणि चंदू नोकराच्या भूमिकेत दिसणारा चंदन प्रभाकर यांनी कपिला टाटा-बाय-बाय केले. काही दिवसांनी चंदन कपिलच्या शोमध्ये परतला पण सुनील व अली हे दोघे अद्यापही परतलेले नाही. अर्थात सध्या   कपिलचा शो सुद्धा बंद झाला आहे. पण मी पुन्हा परतणार, असे कपिल म्हणतोय. कपिलचा शो पुन्हा सुरु झालाच तर सुनील आणि अली असगर त्याच्या शोमध्ये परतणार की नाही, हा तूर्तास तरी जर-तरचा प्रश्न आहे. पण एक मात्र खरे कपिलचा शो  सोडल्याने अली, चंदन व सुनील या सगळ्यांनाच बरेच नुकसान सोसावे लागले आहे. या सगळ्यांचे एकूण ८० लाख ते १ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे, ते कसे जाणून घेऊ यात....अली असगरअली असगर  सध्या ‘ड्रामा कंपनी’ या शोमध्ये दिसतोय. खरे तर मी स्क्रीनवर महिला बनून कंटाळलो होतो. त्यामुळे मी कपिलचा शो सोडला, असे अली म्हणाला होता. पण असे म्हणाल तर नव्या कोºया ‘ड्रामा कंपनी’मध्येही अली महिलेच्याच गेटअपमध्ये दिसतोय. कपिलच्या शोनंतर अली असगरकडे याच भूमिकांचे प्रस्ताव आले. त्याने अशा अनेक आॅफर्स नाकारल्या. वेगळी मनासारखी भूमिका न मिळाल्याने अली असगरला कपिलचा शो सोडल्यानंतर सुमारे सात महिने घरी बसावे लागले. कदाचित आता पर्यायच नाही म्हटल्यावर अलीला पुन्हा त्याच गेटअपमध्ये यावे लागले. कपिलचा शो सोडल्यानंतर सात महिने घरी बसून राहिल्याने अली असगरचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.सुनील ग्रोवरकपिलचा शो सोडल्यानंतर सुनील नाही म्हणायला लाईव्ह शोमध्ये बिझी आहे. पण अद्यापही सुनील कुठलाही निर्णय घेऊ शकलेला नाही. कपिलच्या शोमध्ये येण्यास त्याने नकार दिला. ‘ड्रामा कंपनी’ या शोमध्येही त्याने इंटरेस्ट दाखवला नाही. सुनील स्वत:चा शो घेऊन येणार, अशी चर्चा झाली पण यातही सुनील अपयशी झाला. म्हणजेच, सुनील निघून गेल्याने कपिलचे जितके नुकसान झाले, तितकेच नुकसान कपिलचा शो सोडल्यामुळे सुनीलचेही झाले.चंदन प्रभाकरALSO READ : शो बंद झाल्याने अखेर कपिल शर्मा मान्य केली आपली चूक !सुनील व कपिलच्या वादानंतर चंदन प्रभाकरही कपिलचा शो सोडून गेला. त्यानेही तीन-चार महिने इकडे तिकडे हातपाय हलवून बघितले. या काळात त्याचेहीआर्थिक नुकसान झाले. अखेर तो कपिलच्या शोमध्ये परतला.