Join us  

OMG! गे व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, आता आहे ३ मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 1:13 PM

या अभिनेत्रीनं स्वतःच तिच्या भूतकाळातील नात्याबाबत केला खुलासा

बॉलिवूड असो मराठी सिनेइंडस्ट्रीमधील सेलिब्रेटी बऱ्याचदा त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतात. मग ते सध्याचे असोत किंवा भूतकाळातील. अशीच बॉलिवूडमधील अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या भूतकाळातील रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा केला आहे. 

सेलिना जवळपास ७ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'अ ट्रिब्यूट टू रितुपर्णो घोष: सीजन्स ग्रीटिंग्स'. काही दिवसांपूर्वीच तिने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासा केला.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, कोलकातामध्ये एका गे मेकअप आर्टिस्ट माझी  माझ्या आईसारखी काळजी घेत होता. त्यावेळी मी मॉडेल म्हणून स्ट्रगल करत होते. त्यावेळी मी एका गे व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. तो वयानं बराच मोठा होता आणि मी अवघ्या १६ वर्षांची होते. त्यावेळी काही लोकांच्या अचानक मृत्यूनं माझं आयुष्य बदललं.

सेलिना पुढे म्हणाली, त्यावेळी मला एक गोष्ट समजली की सर्वांना हा हक्क आहे की त्यांना कोणासोबत राहायचं आहे. त्यावेळी मला समजलं की मला काहीतरी करायला हवं. मी अनेक वर्षं LGBT अ‍ॅक्टिव्हिस्ट होते. यूएनने या कामासाठी गुडविल अँबेसिडर म्हणूनही निवडलं होतं. सेलिना जेटलीनं २००१ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सेलिना जेटलीनं २००३ मध्ये जानशीन या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता फरदीन खान मुख्य भूमिकेत होता. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर तिने आणखीन काही सिनेमांमध्ये काम केलं. पण, ती बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करू शकली नाही.

२०११ साली तिनं बिझनेसमन पीटर हागशी लग्न केलं. त्यानंतर ती बॉलिवूडपासून दूरावली. सेलिनाला ४ मुलं आहेत. २०१२ मध्ये तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यांची नावं विराज आणि विस्टन अशी आहेत. त्यानंतर २०१७ मध्ये ती पुन्हा आई झाली त्यावेळीही तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र त्यातील एका बाळाचे हृदयविकारामुळे निधन झाले. 

आता तिचे चाहते तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. 

टॅग्स :सेलिना जेटलीबॉलिवूड