Join us

OMG!! ​‘शिवाय’ सोशल मीडियावर लीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:40 IST

अजय देवगणचा ‘शिवाय’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट रिलीजच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर लीक झाला आहे आणि सिनेमा लीक करणारा ...

अजय देवगणचा ‘शिवाय’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट रिलीजच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर लीक झाला आहे आणि सिनेमा लीक करणारा दुसरा तिसरा कुणी नसून केआरके अर्थात कमाल राशिद खान आहे. होय, ‘शिवाय’च्या मेकर्सनी याप्रकरणी कमाल राशिद खानविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कमालने  twitterवर चित्रपट लीक केला. अर्थात लीक केल्यानंतर काही वेळातच त्याने चित्रपटाचा हा लीक व्हिडिओ डिलीट केला. मात्र त्याचा स्क्रीन शॉट एका वेब पोर्टलच्या माध्यमातून समोर आला आहे.  या बेकायदेशीर कृत्यासाठी कमालविरोधात कडक कायदेशीर पाऊले उचलण्याचा निर्णय ‘शिवाय’च्या मेकर्सनी घेतला आहे. कमालने चित्रपटाचा व्हिडिओ दुबईच्या एका सिनेमागृहातून घेतला. बॉलिवूडचे काही चित्रपट भारतात रिलीज होण्याच्या एक दिवस आधी विदेशात रिलीज होतात.  त्याचाच फायदा घेत, केआरकेने दुबईच्या सिनेमागृहातून चित्रपट कॉपी करून त्याचा व्हिडिओ twitterवर लीक केला.‘शिवाय’च्या निर्मात्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून केआरकेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय सर्व सोशल साईट्लाही नोटीस जारी केली आहे. अशाप्रकारे पायरसी होत असेल तर त्याविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ बॉक्सआॅफिसवर आमने-सामने असणार आहेत. या दोन चित्रपटांपैकी बॉक्स आॅफिसवर कोण बाजी मारतो, ते दिसेलच. पण तूर्तास तरी जाणकारांच्या मते,‘शिवाय’चे पारडे जड आहे. या चित्रपटातील अजयचे अ‍ॅक्शन अवतार थक्क करणारे आहेत. चित्रपटाच्या दोन्ही ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. काही तासांतच प्रत्यक्ष चित्रपट पे्रक्षकांच्या किती पसंतीत उतरतो ते दिसेल.