OMG : विराट कोहलीपेक्षा अनुष्का शर्मा याच्यावर करते जास्त प्रेम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 14:23 IST
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे नाते किती छान आहे, हे प्रत्येकजणाला माहित आहे. मात्र आपणास हे माहित ...
OMG : विराट कोहलीपेक्षा अनुष्का शर्मा याच्यावर करते जास्त प्रेम !
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे नाते किती छान आहे, हे प्रत्येकजणाला माहित आहे. मात्र आपणास हे माहित नाही की, अनुष्का विराटला विसरु शकते मात्र आपल्या आवडत्या डॉगीला नाही विसरु शकत. हो, ही गोष्ट खरी आहे. अनुष्काच्या वाढदिवसाच्या पार्टीला विराट कोहली नव्हता मात्र तिचा हा आवडता डॉगी आवर्जून उपस्थित होता.अनुष्का प्रत्येक दिवशी आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या आवडत्या डॉगीचे फोटो आठवणीने शेअर करते. विशेष म्हणजे अनुष्काने आपल्या या डॉगीला आपले सरनेमदेखील दिले आहे. ती त्याला प्रेमाने डूड शर्मा म्हणून बोलविते. अनुष्काचा जेव्हा मूड खराब असतो, तेव्हा तिचा मूड चांगला करण्यासाठी हाच डूड शर्मा कामी येतो. अनुष्का बऱ्याचदा आपल्या डॉगीसाठी शूटिंगदेखील सोडून येते. जेव्हा अनुष्का श्रीलंकामध्ये ‘बॉम्बे वेलवेट’ची शूटिंग करत होती, त्यावेळी तिला डूडची खूपच आठवण येत होती. ती तेथून त्याच्यासाठी पळून आली होती. अनुष्काने डायरेक्टर अनुराग कश्यपला हे सांगून ब्रेक मागितला होता की, तिला डूडची खूप आठवण येत आहे, त्यामुळे ती विकेंडला मुंबई जाऊ इच्छिते. अनुष्काने म्हटले की, जर ती नाही गेली तर डूड तिला विसरुन जाईल. आणि घडले देखील असे काही की, अनुष्का जेव्हा परत आली तर डूड तिला ओळखत नव्हता आणि तिच्यावर भुंकू लागला. यासाठी अनुष्का आपल्या डॉगीला सोडून जास्त दिवस दूर नाही जाऊ शकत. अनुष्का विराटपासून लांब जाऊ शकते मात्र आपल्या या डॉगीपासून नाही.विराट आणि अनुष्का नेहमीच आपल्या नात्याला घेऊन चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी तर दोघांनी एक अॅडसाठी शूट देखील केले होते. यावेळी दोघांची लजवाब केमिस्ट्री लोकांनी पाहिली. त्यानंतर दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगते आहे. दोघां या आधी अनेक वेळा पार्टीं आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी एकत्र दिसेल होते. मात्र नुकात गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत विराटनं अनेक गोष्टींवरुन पडदा उचलला. अनुष्का शर्मा माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाल्याची प्रमाणिक कबुली विराटने दिली. पुढे विराट म्हणाला की, मुलाखतीदरम्यान विराट सांगितलं की, ‘अनुष्कासोबत असणारं माझं नातं मी सर्वात आधी झहीर खानसोबत शेअर केले होते. त्याच्या सल्ल्यामुळेच अनुष्का आणि माझं नातं आणखी मजबूत झालं.’