Join us  

OMG...! पदार्पणाआधीच 'ह्या' बॉलिवूडच्या स्टार किड्सनी साईन केला दुसरा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:41 PM

बॉलिवूडमधील स्टार किड्सने पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच दुसरा सिनेमा साईन केला आहे

बॉलिवूडमधील स्टार किड्सने पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच दुसरा सिनेमा साईन केला आहे. या स्टार किड्समध्ये अनन्या पांडे, सारा अली खान, तारा सुतारिया आणि ईशान खट्टर या कलाकारांनी पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दुसरा सिनेमा साजरा केला. या कलाकारांचा चाहता वर्गदेखील निर्माण झाला आहे.

अनन्या पांडे 'स्टुडंट ऑफ द ईयर २' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीट कार्तिक आर्यन सोबत 'पति पत्नी और वो' नामक चित्रपटदेखील साईन केला आहे. निर्माता भूषण कुमार 'पति पत्नी और वो' आणि 'मेजावां' चित्रपटाबद्दल म्हणाले की, एक मोठे प्रोडक्शन हाऊस एखाद्या कलाकाराला लाँच करतो. त्यावेळी त्या व्यक्तीबद्दल खूप आश्वासक असतो. मी अनन्या व ताराला भेटलो आहे. ते चित्रपटातील भूमिकेला अनुरूप आहे, त्यामुळे त्यांचा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांना सिनेमात घेण्याबाबत अजिबात दडपण आले नाही. 

ईशान खट्टरने 'धडक' चित्रपटापूर्वी 'बियॉन्ड द क्लाउड्स' साईन केला होता व सारा अली खानचे 'केदारनाथ' व 'सिम्बा' हे चित्रपट प्रदर्शित झाले.अनन्या पांडे, सारा अली खान, तारा सुतारिया आणि ईशान खट्टर या कलाकारांची खरीच कमाल आहे की त्यांच्यातील टॅलेंट पाहून त्यांना पदार्पणाआधीच दुसरा चित्रपट मिळाला.

टॅग्स :सारा अली खानअनन्या पांडेतारा सुतारिया