Join us  

OMG !! ​अक्षय कुमारला सोडून ट्विंकल खन्ना पडली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 5:15 AM

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, अक्षयची धर्मपत्नी ट्विंकल खन्ना दुस-याच कुणाच्या प्रेमात पडली आहे. ...

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, अक्षयची धर्मपत्नी ट्विंकल खन्ना दुस-याच कुणाच्या प्रेमात पडली आहे. अक्षय ट्विंकलवर जीवापाड प्रेम करतो. पण ट्विंकलला मात्र अक्षयसोडून दुसराच कुणी आवडू लागला आहे. विश्वास बसत नसेल तर ट्विंकलचे काही tweets तुम्ही वाचालयाच हवेत. आता तुम्ही म्हणाल, हे सगळे ठीक़ पण ट्विंकलला नेमके प्रेम झाले तरी कुणावर? तर कटप्पावर. होय, ‘बाहुबली2’मधील कटप्पाची भूमिका साकारणा-या अभिनेत्यावर. म्हणजेच सत्यराज याच्यावर. काल ट्विंकलने ‘बाहुबली2’ पाहिला. हा चित्रपट पाहिला अन् ट्विंकल जणू ‘कटप्पामय’ झाली. इतकी की, तेव्हापासून आपल्या मुलीला ती कटप्पा म्हणूनच हाक मारू लागली आहे.  खुद्द ट्विंकलने ही गोष्ट आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे. ‘बाहुबली2’ पाहिला अन् तेव्हापासून मी माझ्या मुलीला कटप्पा या नावानेच बोलवते आहे. हे तिच्या वडिलांना(अक्षय) अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे आहे. कारण त्याला आपल्या मुलीला कदाचित राऊडी म्हणून हाक मारलेली आवडेल, असे एका tweetध्ये ट्विंकलने म्हटले आहे. यानंतर तिने आणखी एक tweet केले. कदाचित मी थोडी आॅबसेस्ड आहे. पण ट्राय करा. तीनदा कटप्पा म्हणा व नंतर तुम्ही स्वत:ला रोखू शकणार नाही. हे सगळे वेफर्स खाण्यासारखे आहे, असे ती म्हणाली. कटप्पाची स्तुती करत, ट्विंकलने  चुकून कटप्पा अर्थात सत्यराज यांचा मुलगा सिबीराज याच्या अकाऊंटला टॅग केले. कटप्पाच्या मुलाच्या अकाऊंटला टॅग करत ट्विंकलने लिहिले, ‘सर, तुम्ही शानदार आहोत. आम्ही पार्ट 1 आणि पार्ट2 पाहिलेत. अभूतपूर्व यशासाठी शुभेच्छा.’ यावर सिबीराज याने टिष्ट्वंकलला मनापासून धन्यवाद दिले. मॅम, मी कटप्पाचा मुलगा. पप्पा तुमचे tweet पाहून आनंदी होतील. ते राजेश खन्ना यांचे खूप मोठे चाहते आहेत. तुमच्या कुटुंबाला आमचे प्रेम, असे तो म्हणाला.ALSO READ : ​ रवीना टंडन म्हणते, ट्विंकल माझी चांगली मैत्रिण!