OMG !! १०२ वर्षांचे वडिल, ७५ वर्षांचा मुलगा; पुन्हा एकत्र येणार अमिताभ अन् ऋषीची जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 15:08 IST
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी आपल्या काळात एकत्र अनेक हिट सिनेमे दिलेत. आता ही जोडी ब-याच वर्षानंतर पुन्हा ...
OMG !! १०२ वर्षांचे वडिल, ७५ वर्षांचा मुलगा; पुन्हा एकत्र येणार अमिताभ अन् ऋषीची जोडी!
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी आपल्या काळात एकत्र अनेक हिट सिनेमे दिलेत. आता ही जोडी ब-याच वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे. याबद्दल अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. पण ऋषी कपूर यांनी टिष्ट्वटरवर अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत काम करणे आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. टीमसोबत स्क्रिप्टचे वाचन करतो आहे. अधिक माहितीसाठी प्रतिक्षा करा, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.यावरून ऋषी कपूर अमिताभसोबत काम करणार हे पक्के झालेय. पण आमच्याकडे अमिताभ व ऋषी यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल आणखी डिटेल्स आहेत. या चित्रपटात अमिताभ व ऋषी कपूर बाप-लेकाच्या भूमिकेत दिसणार आहे. होय, ऋषी कपूर यात अमिताभच्या मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. उमेश शुक्ला या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. उमेश शुक्ला यांनी ‘ज्युनिअर बच्चन’ अभिषेक बच्चन व ऋषी कपूर स्टारर ‘आॅल इज वेल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘१०२ नॉट आऊट’ असे या चित्रपटाचे नाव असल्याचे कळतेय. याच नावाच्या गुजराती नाटकावर हा चित्रपट आधारित असेल. या चित्रपटात आधी परेश रावल यांची वर्णी लागली होती. पण आता परेश रावल यांच्या जागी ऋषी कपूर यांची वर्णी लागली आहे. मध्यंतरी हा चित्रपट गुंडाळण्यात आल्याची बातमी आली होती. पण आता या चित्रपटावर वेगाने काम सुरु झाले आहे.‘१०२ नॉट आऊट’ची कथा एका १०२ वर्षीय वयाच्या दत्तात्रय वखारिया या व्यक्तिरेखेभोवती फिरते. दत्तात्रय यावयातही कमालीचा महत्त्वाकांक्षी असतो. याऊलट त्याचा ७५ वर्षांचा मुलगा तितकाच सनकी आणि भावनाशून्य असतो.ऋषी कपूर व अमिताभ यांची जोडी १९९१ मध्ये ‘अजुबा’मध्ये अखेरची दिसली होती. त्यापूर्वी ‘अमर अकबर अॅन्थोनी’,‘नसीब’,‘कभी कभी’ यासारख्या हिट सिनेमात दिसले आहेत.