Join us

आता येणार ‘ओम शांती ओम’चा जपानी रिमेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:21 IST

सन २००७ मध्ये शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा ‘ओम शांती ओम’ हा म्युझिकल ड्रामा लोकांना चांगलाच भावला होता. ...

सन २००७ मध्ये शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा ‘ओम शांती ओम’ हा म्युझिकल ड्रामा लोकांना चांगलाच भावला होता. आता हाच चित्रपट जपानी भाषेत येतोय. विशेष म्हणजे, चित्रपटाचा फ्लेवर ब-याचअंशी ओरिजनल चित्रपटासारखा ठेवण्यात आला आहे. गत ९ नोव्हेंबरला ‘ओम शांती ओम’च्या रिलीजला नऊ वर्षे पूर्ण झालीत. २००७ मध्ये याच दिवशी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकला होता. तब्बल नऊ वर्षानंतर हा चित्रपट जपानी भाषेत तयार होतो आहे. दिग्दर्शक फराह खान यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. जपानमध्ये बिग बजेट म्युझिकल फिल्म म्हणून ‘ओम शांती ओम’ साकारणार असल्याचे तिने सांगितले. फराहचा हा चित्रपट अनेक अर्थाने खास होता. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटातून आजची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने बॉलिवूड डेब्यू केले होते. टायटल ट्रॅकमध्ये  सुमारे ३० बॉलिवूड स्टार्सचा स्पेशल कॅमिओ हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ‘ओम शांती ओम’मध्ये पहिल्या जन्मात दीपिका सुपरस्टार असते तर शाहरूख एक ज्युनिअर आर्टिस्ट. तर दुस-या जन्मात शाहरुख सुपरस्टार असतो. तो सूड उगवण्यासाठी दीपिकाचा अभिनेत्री म्हणून वापर करतो. अर्जून रामपालने यात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.‘ओम शांती ओम’ या चित्रपटानंतर फराहने ‘हॅपी न्यू ईयर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपटही हिट झाला. आता फराहच्या ‘ओम शांती ओम’चा जपानी रिमेक किती हिट होतो, ते बघूयात.