Join us  

अरेच्चा...! चक्क रणबीर कपूरने केली आलिया भटची मिमिक्री, व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 10:58 AM

रणबीर कपूर व आलिया भट यांचे अफेयर सुरू असल्याचे बोलले जाते. यादरम्यान काळातील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे ज्यात आलिया मिमिक्री करताना दिसते आहे.

करण जोहरचा चॅट शोच्या यंदाच्या सीझनमध्ये आलिया भट व दीपिका पादुकोणने एकत्र हजेरी लावली होती. यापूर्वी या शोमध्ये रणबीर कपूर व रणवीर सिंगनेदेखील एकत्र हजेरी लावली आहे. या दोघांच्या अभिनयाबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. मात्र हे दोघे खूप चांगली मिमिक्री देखील करतात.

सध्या करण जोहरच्या कॉफी विथ करण शोचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात रणवीर सोनम कपूर व रणबीर आलिया भटची नक्कल करताना दिसत आहेत. या भागात करणने रणबीर आणि रणवीरला सांगितले होते की, तुम्ही स्वतःला आलिया व सोनमला इमॅजिन करून चर्चा करायची की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीला पुरस्कार कोणाला मिळणार. 

२०१६मध्ये सोनमला नीरजा व आलियाला उडता पंजाब आणि कपूर अॅण्ड सन्ससाठी नामांकन मिळाले होते. या व्हिडिओत रणवीर सिंगने सोनमची खूप मजेशीर नक्कल केली आहे. रणवीर सिंग व रणबीर कपूरचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.

आलिया भट व रणबीर कपूरच्या रोमांसची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यादरम्यान महेश भटने या गोष्टीला कन्फर्म केले. मात्र आलिया व रणबीर याबाबतचा खुलासा कधी करतात, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :आलिया भटरणवीर सिंग