Join us  

अरे वा! नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 5:32 PM

नव्या सिनेमाला घेऊन नुसरत खूपच उत्साही आहे

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री नुसरत भरूच्याचा आता एका हॉरर सिनेमाच्या माध्यमातून फॅन्सना घाबरवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुसरतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या नव्या प्रोजेक्टची माहिती फॅन्सना दिली आहे. नव्या सिनेमाला घेऊन नुसरत खूपच उत्साही आहे. 'छोरी' या सिनेमात ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा मराठी अॅवॉर्ड विनिंग सिनेमा लपाछुपीचा रिमेक आहे. मराठी सिनेमात मुख्य भूमिका अभिनेत्री पूजा सावंतने साकारली होती. सिनेमाची कथा नुसरत भवती फिरणारी आहे. 

नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली. 2002 मध्ये आलेल्या या मालिकेत बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लो मुख्य भूमिकेत होती. पण वर्षभरातच ही मालिका सोडण्याचा निर्णय तिने घेतला. कारण मोठा पडदा तिला खुणावत होता. हातची मालिका सोडून नुसरत चित्रपट मिळवण्यासाठी धडपडू लागली.

‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला. ‘प्यार का पंचनामा 2’ हा तिचा सिनेमा हिट झाला. यानंतर तीन वर्षांनी 2018 मध्ये तर नुसरतची जणू लॉटरी लागली. होय, या वर्षात आलेला ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा तिचा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. आयुषमान खुराणासोबत ‘ड्रिमगर्ल’मध्ये झकळली होती. तिचा हा सिनेमाही हिट झाला होता.

टॅग्स :नुसरत भारूचा