Join us  

Yeh Dil Maange More! म्हणून ‘सोनू के टीटू की स्वीटी’ची अभिनेत्री नुसरत भारूचाने बदलले नाव   

By रूपाली मुधोळकर | Published: November 04, 2020 6:09 PM

‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

ठळक मुद्देअंकशास्त्र, ज्योतिष शास्त्रावर विश्वास असणारी नुसरत बॉलिवूडची पहिली अभिनेत्री नाही. तिच्यासारखे अनेकजण इंडस्ट्रीत आहेत.

‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. अगदी अनपेक्षितरित्या या चित्रपटाने १०८.७१ कोटींची कमाई करत, सगळ्यांना आश्चयार्चा धक्का दिला होता. हा चित्रपट एक सरप्राईज हिट होता. या चित्रपटाने नुसरतला वेगळी ओळख दिली. पण करिअरच्या या टप्प्यावर नुसरत फार समाधानी दिसत नाही. कदाचित म्हणूनच करिअर शिखरावर नेण्यासाठी तिने चक्क आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे.

आधी इंग्रजीत तिच्या नावाचे स्पेलिंग Nushrat Bharucha असे होते. आता ते बदलून Nushrratt Bharuccha असे झाले आहे. या नव्या स्पेलिंगमध्ये तिने R, Tआणि C या इंग्रजी अक्षरांची भर घातली आहे. नाव बदलल्याने नशीब साथ देईल, असे तिला वाटते.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत स्वत: नुसरतने नावात बदल केल्याची माहिती दिली. शिवाय यामागचे कारणही सांगितले. तिने सांगितले, माझा नशिबावर विश्वास आहे. ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड सगळ्यांवर माझी प्रगाढ श्रद्धा आहे. ब्रह्मांड आणि याची ऊर्जा यावरही माझा विश्वास आहे. अलीकडे मी एका  अंकशास्त्र विषयात तज्ज्ञ असलेल्या एका व्यक्तीस भेटले. त्यांनी मला माझ्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्यास होणा-या लाभांबद्दल सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार तिने आपल्या नावात काही बदल केला आहे. या नव्या स्पेलिंगमुळे माझे करिअर आणखी उंचीवर जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे. 

अंकशास्त्र, ज्योतिष शास्त्रावर विश्वास असणारी नुसरत बॉलिवूडची पहिली अभिनेत्री नाही. तिच्यासारखे अनेकजण इंडस्ट्रीत आहेत. आयुष्यमान खुराणा, हृतिक रोशन, राजकुमार राव, करिश्मा कपूर, तुषार कपूर, अजय देवगण, रितेश देशमुख अशा अनेक सेलिब्रिटींनी याआधी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केले आहेत.नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती हंसल मेहता यांच्या ‘छलांग’ या सिनेमात झळकणार आहे. येत्या 19 नोव्हेंबरला हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हुडदंग आणि छोरी या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. लव रंजनच्या एका सिनेमासाठीही तिला साईन करण्यात आल्याची चर्चा आहे.

टॅग्स :नुसरत भारूचा