Join us

​आता पाहा, ‘सरबजीत’मधील पहिले गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:56 IST

‘सरबजीत’ या चित्रपटाचे पहिले गाणे आज  रिलीज झाले. 

ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चड्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सरबजीत’ची चाहत्यांना प्रतीक्षा आहेच. या चित्रपटाचे रोमांचक ट्रेलर तुम्ही बघितलाच. आज या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले. सलामत...हे गाणे म्हणजे सरबजीतमधील रोमॅन्टिक गाणे. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटातील गाणे तुमच्याही हृदयाला स्पर्शून जाईल, असेच आहे. सरबजीत तुरुंगात आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदी क्षणांचे स्वप्न तो रंगवतो आहे, असे यात दाखवले आहे. हा चित्रपट येत्या २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेव्हा पाहा तर मग...