आता असा दिसतोय अमरेन्द्र बाहुबली; पाहा,अमेरिकेहून परतलेल्या प्रभासचा पहिला फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 16:08 IST
अमरेन्द्र बाहुबली दीर्घ सुट्टीवरून परतला आहे. होय, सुटीवरून परतल्यानंतरचा त्याचा पहिला फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय, गेल्या ...
आता असा दिसतोय अमरेन्द्र बाहुबली; पाहा,अमेरिकेहून परतलेल्या प्रभासचा पहिला फोटो!
अमरेन्द्र बाहुबली दीर्घ सुट्टीवरून परतला आहे. होय, सुटीवरून परतल्यानंतरचा त्याचा पहिला फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय, गेल्या महिनाभरात प्रभासने अमेरिकेत मस्तपैकी एन्जॉय केले. पण यादरम्यानचा एकही फोटो चुकूनही सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. एकंदर काय तर प्रभासने सगळ्या सुट्टया अगदी गुपचूप प्लान केल्या आणि तितक्याच गुपचूपपणे त्या एन्जॉयही केल्यात. यादरम्यान अख्खा मीडिया त्याच्यावर मागावर होता. प्रभासचा एक तरी फोटो हाती लागावा, म्हणून प्रयत्न करत होता. पण प्रभास चांगलाच चतूर निघाला. स्वत:चा एकही फोटो त्याने लिक होऊ दिला नाही. पण चला, व्हॅकेशनदरम्यानचा नाही तर किमान व्हॅकेशन नंतरचा . होय, अमेरिकेहून भारतात परतानाचा एक फोटो आमच्या हाती लागला आहे. हा ‘बाहुबली’नंतरचा प्रभासचा पहिला फोटो आहे. यात प्रभास अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसतो आहे. ‘बाहुबली’पेक्षा अगदी वेगळा. त्याचा हा लूक त्याचा आगामी सिनेमा ‘साहो’साठीचा आहे. भारतात परतताच प्रभास त्याच्या या नव्या चित्रपटात व्यस्त झाला आहे. यात प्रभाससोबत तुमची आमची आणि प्रभासची आवडती अनुष्का शेट्टीही आहे. ‘बाहुबली’ सीरिजसाठी प्रभासने सर्वाधिक मेहनत घेतली. आयुष्यातील जवळपास पाच वर्षे त्याने या चित्रपटाला दिलेत. या चित्रपटाला १०० टक्के देता यावे म्हणून याकाळात एकही सिनेमा साईन केला नाही. आपले पूर्ण लक्ष ‘बाहुबली’वर केंद्रीत केले. त्याचा रिझल्ट आपण सगळे बघतो आहोतच. ‘बाहुबली2’ने मिळवलेले अभूतपूर्व यश त्याचाच परिपाक आहे. या चित्रपटाने जगभरात १७०० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. या यशात प्रभासचा किती मोठा वाटा आहे, हे सांगणे नकोच!