आता इन्स्टाग्रामवरही कॅटरिना कैफ झाली अॅक्टिव्ह; ‘हा’ फोटो केला पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 22:05 IST
सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला जणू काही सोशल मीडियाचा लळा लागला आहे. कालच फेसबुकवरून तिने नवे घर घेतल्याचा आनंद तिच्या फॅन्सबरोबर शेअर केला होता.
आता इन्स्टाग्रामवरही कॅटरिना कैफ झाली अॅक्टिव्ह; ‘हा’ फोटो केला पोस्ट!
सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला जणू काही सोशल मीडियाचा लळा लागला आहे. कालच फेसबुकवरून तिने नवे घर घेतल्याचा आनंद तिच्या फॅन्सबरोबर शेअर केला होता. आता कॅटरिना इन्स्टाग्रामवर अॅक्टिव झाली असून, फॅन्सबरोबर कनेक्ट होण्यास ती खूपच उत्साहित असल्याचे दिसून येत आहे. फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी कॅटरिनाने २६ एप्रिल रोजी इन्स्टाग्राम अकाउंट क्रिएट केले. लगेचच तिने २७ एप्र्रिल रोजी तिचा एक फोटोही अकाउंटवर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करताना कॅटरिनाने लिहिले की, ‘नवी सुरुवात... माझ्या हॅप्पी प्लेसमधून... हॅलो इन्स्टाग्राम!’ कॅटरिनाच्या या पोस्टला हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळत असून, दोनच दिवसांत तिच्या फॉलोअर्सची संख्या साडेसहा हजारांच्या वर पोहोचली आहे. कॅटरिना आता इन्स्टाग्रामवर झळकणार याचा तिच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण तिने फोटो शेअर करताच आतापर्यंत १५९,५८१ यूजर्सनी तिच्या फोटोला लाइक्स केले आहे. शिवाय फोटोला कमेण्ट देताना अनेकांनी तिचे वेलकमही केले आहे. त्याचबरोबर कॅटरिनाचे इन्स्टाग्राम डेब्यू बॉलिवूडकरांसाठीही एकप्रकारे सुखद ठरले आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिला वेलकम करताना म्हटले की, अखेर कॅटरिनाला इन्स्टाग्रामवर आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. तर तिचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि ‘टायगर जिंदा है’चा अभिनेता सलमान खान यानेही आपल्या अभिनेत्रीचे वेलकम केले आहे. तसेच इतरांनाही कॅटरिनाला वेलकम करावे, असे लिहिले आहे. इन्स्टाग्रामवर बहुतांश कलाकारांचे अकाउंट्स आहेत. शूटिंग असो वा इतर क्षण याचे ते फोटोज् अपलोड करत असतात. अशात कॅटरिना कशी मागे राहू शकणार? या विचारानेच तिचे फॅन्स हरकून गेले आहेत. आता तिने नियमितपणे आपल्या फॅन्ससाठी काहीतरी मिर्च मसाला या अकाउंटवर अपलोड करणे अपेक्षित आहे.