अजय देवगण(Ajay Devgan)च्या 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर आणि रवी किशन सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलर लाँचवेळी अजय देवगण केवळ चित्रपटाबद्दलच नाही तर इतर अनेक वादग्रस्त मुद्द्यांवरही माध्यमांशी मोकळेपणाने बोलताना दिसला.
जेव्हा प्रसारमाध्यमांनी अजय देवगणला दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३' चित्रपटाबद्दल आणि त्याच्याशी संबंधित वादांबद्दल काही प्रश्न विचारले तेव्हा त्याने या सर्व वादांवर त्याचे मत काय आहे हे सांगितले. खरेतर या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरला कास्ट केल्याबद्दल अनेक लोक संतापले आहेत, विशेषतः पहलगाममधील अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, FWICE ने दिलजीतवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मीडियाच्या प्रश्नांवर अजय म्हणाला, कोण बरोबर आहे आणि कोण चूक हे मी सांगू शकत नाही. प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो. त्यांनी बसून चर्चेद्वारे हा मुद्दा सोडवावा. अजय म्हणाला की, तो कोणावरही बोट दाखवू इच्छित नाही किंवा तो कोणावरही दोषारोप करू इच्छित नाही. तो असा विश्वास ठेवतो की हे सर्व वाद आपापसात बोलून सोडवता येतात.
हिंदी विरुद्ध मराठी वादावर अजय म्हणाला...अलीकडेच महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरील वाद तीव्र झाला आहे. शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या करण्यावर अनेक लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जेव्हा अजय देवगणला या वादांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा तेव्हा त्याने त्याच्या सिंघम शैलीत 'आता माझी सतकली' असे उत्तर दिले. अभिनेत्याच्या या उत्तरावर अनेक चाहते हसले आणि वातावरण शांत झाले. या संपूर्ण कार्यक्रमात अभिनेत्याने कोणावरही कोणत्याही प्रकारचा आरोप केला नाही आणि संवादातून वाद सोडवण्याचा सल्ला दिला. चाहत्यांना त्याचा शांत स्वभाव खूप आवडला.
'सन ऑफ सरदार २'बद्दलचित्रपटाच्या रिलीजबद्दल सांगायचं झालं तर, हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि यावेळी सोनाक्षी सिन्हाच्या जागी मृणाल ठाकूर या चित्रपटात दिसणार आहे.