Join us  

दीपिका पादुकोण आधी या अभिनेत्रीनेही साकारली होती अॅसिड सर्वाइवरची भूमिका, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 10:13 AM

हा सिनेमा होता 'उयारे' सिनेमात पार्वती थिरुवोथु या दाक्षिणात्य अभिनेत्रीने अॅसिड सर्वाइवरची भूमिका साकारली होती.

दीपिका सध्या अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित 'छपाक' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती दीपिका अॅसिड सर्वाइवरची भूमिका साकारणार आहे.  या सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. सध्या सिनेमाचे वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार प्रमोशन सुरु आहे. दीपिकाचा सिनेमातील लूक पाहून सर्वच स्थरावरून या विषयी चर्चा सुरू झाली. मात्र अशा प्रकारची भूमिका साकारणारी दीपिकाही पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वीही एका अभिनेत्रीने ही भूमिका साकारली होती.मात्र या सिनेमाला पाहिजे तशी लोकप्रियता मिळाली नाही. हा सिनेमा होता 'उयारे' सिनेमात  पार्वती थिरुवोथु या दाक्षिणात्य अभिनेत्रीने  अॅसिड सर्वाइवरची भूमिका साकारली होती.  

'छपाक' सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यापासून पुन्हा एकदा पार्वती थिरूवोथु प्रकाशझोतात आली आहे. पार्वतीने सिनेमात साकारलेल्या सिनेमाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पार्वतीने आतापर्यंत मलयालम, तेलुगू आणि कन्नड़ भाषिक सिनेमात सगळ्यात जास्त काम केले आहे. तिने आपल्या करिअरची सुरूवात 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या मळयालम 'आउट ऑफ स्लेबस' सिनेमातून केली होती. पार्वती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम भरतनाट्यम डांसरही आहे.  

तुर्तास दीपिकाशिवाय छपाक  सिनेमात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकाने प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. या लुकसाठी दीपिकाला तासन् तास मेकअप करावा लागत असे. ‘छपाक’चे शूटिंग संपल्यावर शेवटच्या दिवशी दीपिकाने हे प्रोस्थेटिक्स लुक जाळून टाकले होते. एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता. ‘मी या प्रोस्थेटिक्सचा एक तुकडा घेतला. अल्कोहोल घेतले आणि एका कोप-यात नेऊन तो प्रोस्थेटिक्स जाळून टाकला’, असे तिने सांगितले होते.

सिनेमात मालतीचा अॅसिड अटॅक झाल्यानंतरचा खडतर प्रवास दाखवण्यात आला आहे. अॅसिड अटॅकनंतर ती स्वतःच्या चेहऱ्याचा तिरस्कार करू लागते आणि नंतर स्वतःवर प्रेमही करू लागते. त्यानंतर मालती देशातील अॅसिड अटॅक झालेल्या मुलींसाठी काम करू लागते. ट्रेलरच्या अखेरीस मालतीच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य त्यांनी माझा चेहरा बदललाय माझं मन नाही हे मनाचा ठाव घेतो.

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाक