Join us  

Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 11:06 AM

Aryan Khan : शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती. आर्यनने एनसीबीच्या चौकशीत कबूल केले होते की, तो मागील ४ वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे. न्यायालयाने आर्यनचा जामीन नाकारला आहे. न्यायालयाने आर्यनला १४ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे केवळ शाहरुखलाच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. आज जाणून घेऊयात अशाच काही बॉलिवूड स्टारकिड्सबद्दल ज्यांनी तुरूंगाची हवा खाल्ली आहे.

संजय दत्त-

१९९३ मध्ये बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त यांचा मुलगा आणि अभिनेता संजय दत्तला एअरपोर्टवरून अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्याच्या घरातून अवैध शस्त्र मिळाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्याला टाडा आणि आर्म्स अॅक्ट अटक करण्यात आली. या प्रकरणात २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर कमी करून ही शिक्षा ३ वर्ष करण्यात आली. २०१३ पासून संजय दत्त पुण्याच्या येरवडा कारागृहात होता आणि २०१६ मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका झाली.

सलमान खान -

सलीम खान यांचा मुलगा अभिनेता सलमान खानने २००२ साली त्याची कार वांद्रेच्या फुटपाथवर चढवली. यादरम्यान त्याच्या कारखाली चिरडून एका मजुराचा मृत्यू झाला आणि चार लोक जखमी झाले. असे म्हटले जाते की, सलमान खान दारूच्या नशेत गाडी चालवत होता. त्यानंतर त्याला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले. पण नंतर त्याला जामीन मिळाला. २०१५ मध्ये त्याला कनिष्ठ न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली. सलमान म्हणाला की, तो कार चालवत नव्हता, पण त्याचा ड्रायव्हर कार चालवत होता.

सूरज पांचोली -

अभिनेत्री जिया खानने २०१३ साली गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, तिने मागे एक सुसाईड नोटही सोडली होती. जियाने अभिनेता आदित्य पांचलीचा मुलगा सूरज पांचोलीवर शारीरिक शोषण करणे, तिला गर्भपात करण्यास भाग पाडणे असे गंभीर आरोप केले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी सूरज पांचोलीला अटक केली होती. त्यानंतर त्याला तुरुंगात जावे लागले. मुंबई उच्च न्यायालयाने मात्र सूरजला दिलासा देत म्हटले की, तो जियाच्या आत्महत्येला जबाबदार नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे.

टॅग्स :आर्यन खानशाहरुख खानसंजय दत्तसलमान खानसुरज पांचोलीमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी