Join us  

‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 10:42 AM

भन्साळींचा चित्रपट आणि सलमान -आलिया म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. आता याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. चर्चा खरी मानाल तर आलिया ही भन्साळींची पहिली पसंत नव्हतीच.

ठळक मुद्देदीपिकाने याआधी भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘पद्मावत’ या चित्रपटांत काम केले आहे. हे तिन्ही चित्रपट सुपरहिट राहिले.

संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात सलमान खान त्याच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान आलिया भटसोबत आॅनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. काल सलमान व आलियाच्या या चित्रपटाची घोषणा झाली आणि सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा रंगली. भन्साळींचा चित्रपट आणि सलमान -आलिया म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. आता याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. चर्चा खरी मानाल तर आलिया ही भन्साळींची पहिली पसंत नव्हतीच. होय, संजय लीला भन्साळी या चित्रपटात दीपिका पादुकोणला कास्ट करू इच्छित होते. पण काही कारणास्तव बोलणी फिस्कटली आणि भन्साळींनी या चित्रपटासाठी आलियाला साईन केले.

दीपिकाने याआधी भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘पद्मावत’ या चित्रपटांत काम केले आहे. हे तिन्ही चित्रपट सुपरहिट राहिले. अशात ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटातही सलमानसोबत दीपिकाच दिसेल, असे लोक मानून चालले होते. भन्साळी दीपिकाला त्यांच्यासाठी लकी मानतात, हेही यामागचे कारण होते. ‘

इंशाअल्लाह’ हा चित्रपट एक लव्ह ड्रामा असल्याचे कळतेय. तूर्तास आलिया अनेक चित्रपटांत बिझी आहे. लवकरच आलिया धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’मध्ये दिसणार आहे. यानंतर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती झळकणार आहे. यात ती बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय धर्मा प्रॉडक्शनचाच ‘तख्त’ आणि ‘बाहुबली’ फेम एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपटही आलियाने साईन केला आहे. आता भन्साळींच्या चित्रपटात आलियाची वर्णी लागली आहे. आलिया व सलमानची जोडी पाहायला तुम्ही किती उत्सूक आहात, ते सांगायला विसरू नका. सलमानचे म्हणाल तर सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. यापाठोपाठ ‘दबंग 3’ या चित्रपटात सलमान दिसणार आहे. ‘दबंग 3’ हातावेगळा करताच भाईजान भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये बिझी होणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणआलिया भटसलमान खानसंजय लीला भन्साळी