Join us  

नोरा फतेही म्हणतेय, हा चित्रपट ठरेल माझ्या करियरमधील टर्निंग पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 7:00 AM

स्ट्रीट डान्सर थ्रीडीनंतर नोरा फतेही या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

वर्षाची सुरूवात स्ट्रीट डान्सर थ्रीडी चित्रपटाने केल्यानंतर आता अभिनेत्री व डान्सर नोरा फतेही आगामी चित्रपट भुजः द प्राइड ऑफ इंडियामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती गुप्तहेरची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळावर आधारीत आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी नोराने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये ट्रेनिंग घेतले आहे.

नोराने या चित्रपटाबाबत सांगितलं की, मी बेसिक गोष्टी शिकली आहे. ज्यात लाथ मारणे, मुक्का मारणे आणि खाली पाडणे आणि बंदुक चालवणे या गोष्टींचा समावेश आहे. ही एक परफॉर्मन्स ओरियंटेड भूमिका आहे आणि ही भूमिका माझ्या करियरला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. 

नोराने स्ट्रीट डान्सर थ्रीडी चित्रपटातून खूप काही शिकायला मिळाल्याचं सांगितलं. मात्र एक डान्सर म्हणून आपली छाप उमटविल्यानंतर आता तिला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. 

साचेबद्ध काम करणं कलाकाराच्या प्रगतीमध्ये अडचण ठरते. वेगवेगळ्या गोष्टी व भूमिका केल्यानंतर लोकांच्या मनातून साचेबद्ध अभिनेत्रीची इमेज निघून जाईल. सध्या गोष्टी बदलत असल्याचं नोरा सांगत होती.

टॅग्स :नोरा फतेहीस्ट्रिट डान्सर 3 डी