Join us  

Video: नोरा फतेहीने दाखवली तिच्या नव्या डान्स व्हिडिओची झलक, डान्स मूव्ह्ज पाहून फुटेल तुम्हाला घाम...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 2:42 PM

. दिवसेंदिवस नोराची फॅन फॉलोईंग कमालीची वाढत आहे.

बॉलिवूडची टॉप डान्सर नोरा फतेही सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. आपल्या अभिनयापेक्षा डान्समुळेच नोरा चर्चेत असते.  दिलबर, कमरिया, साकी-साकी आणि अलीकडेच गुरु रंधावाच्या 'नच मेरी रानी' या गाण्यात आपल्या डान्सच्या जोरावर फॅन्सची मनं जिंकणाऱ्या नोराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नुकतीच नोरा फतेहीचा डान्स प्रॅक्टिसचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

या क्लिपमध्ये नोरा धमाकेदार डान्स मूव्हज करताना दिसतेय.  डान्सबाबत नोरा बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्रींना मागे सोडत आहे. दिवसेंदिवस नोराची फॅन फॉलोईंग कमालीची वाढत आहे. इतकेच काय तर मोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्येही नोराला जागा दिली जात आहे. आपल्या खास अंदाजाने ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडते.

नोरा फतेहीने 2014मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 9' मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नोरा रेमो डिसुझाच्या 'स्ट्रीट डान्सर ३ डी' सिनेमात दिसली होती. त्यात ती वरूण धवन आणि श्रद्धा कपूरसोबत दिसली होती.तसेच ती अजय देवगनच्या आगामी सिनेमातही दिसणार आहे. तर इतरही काही सिनेमांमध्ये ती आपल्या बहारदार डान्सने सर्वांचं मनोरंजन करणार आहे.

टॅग्स :नोरा फतेही