Join us  

आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली नोरा, पाहून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 3:51 PM

होय, नोरा किराणा आणायला बाहेर पडली आणि यावेळी तिचा लुक पाहून सगळेच हैराण झालेत.

ठळक मुद्देजॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या सिनेमातील ‘दिलबर’ या गाण्याने नोरा थिरकताना दिसली आणि या गाण्याने जणू तिचे नशीब बदलले.

आपल्या डान्स आणि अदांनी चाहत्यांना खल्लास लावणारी बॉलिवूडची आयटम क्वीन व अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. कधी डान्स, कधी बोल्ड व ग्लॅमरस फोटो, कधी स्टाईल तर कधी घायाळ करणा-या अदांमुळे तिची चर्चा होते. सध्या मात्र ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, नोरा किराणा आणायला बाहेर पडली आणि यावेळी तिचा लुक पाहून सगळेच हैराण झालेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका प्रसिद्ध दुकानाबाहेर नोरा स्पॉट झाली आणि पापाराझींचे कॅमेरे तिच्याकडे वळले.

 आरपार दिसणारे सायकल शॉर्ट्स आणि ब्लॅक कलरची टी-शर्ट असा तिचा लूक होता. यावेळी तिच्या ट्रान्सपरंट शॉर्ट्स पाहून सर्वांचा नजरा तिच्यावर खिळल्या. तिच्या  मिनी स्लिंग बॅगनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही बॅगच नुसती 89 हजारांची होती.

नोरा हॉट आणि बोल्ड फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. त्या तुलनेत तिचा हा लुक किंचितसा बोरिंग वाटला. पण हो, नोराचा हा लुक तुलनेनं बोरिंग असला तरी त्याचीही चर्चा झालीच.

2015 मध्ये नोराने ‘बिग बॉस 9’मध्ये एन्ट्री केली आणि 84 व्या दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर बाहेर पडली. 2016 मध्ये तिने ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअ‍ॅॅलिटी शोमध्ये भाग घेतला. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या सिनेमातील ‘दिलबर’ या गाण्याने नोरा थिरकताना दिसली आणि या गाण्याने जणू तिचे नशीब बदलले. रिक्रिएट करण्यात आलेल्या या गाण्याला पहिल्या दिवशी 20 मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले होते. भारतील गाण्याच्या इतिहासात हा एक रेकॉर्ड होता. यानंतर नोराने कधीच मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :नोरा फतेही