Join us  

या अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडल्यामुळे संपले होते या क्रिकेटरचे करियर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 3:24 PM

या अभिनेत्रीच्या पतीने या दोघांना एका रूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते.

ठळक मुद्देएकदा नूरजहाँ आणि नजर मोहोम्मद यांना नुरजहाँच्या पतीने रंगेहात एका रूममध्ये पकडले होते. नूरजहाँ यांच्या पतीला पाहाताच नजरने खिडकीमधून खाली उडी मारली होती.

पाकिस्तानी अभिनेत्री नूरजहाँ यांची आज म्हणजेच 23 डिसेंबरला पुण्यतिथी असून त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1926 ला पाकिस्तानमध्ये झाला. त्यांना पाकिस्तानकडून मल्लिका ए तरन्नूम हा किताब देण्यात आला होता. त्यांनी हिंदी, उर्दू, सिंधी, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या पाकिस्तानमधील त्या पहिल्या महिला निर्मात्या होत्या. 

नूरजहाँ यांनी खानदान या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री घेतली होती. या चित्रपटात त्यांची जोडी प्राण यांच्यासोबत जमली होती. त्यांच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाला होती. नूरजहाँ यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे.

पाकिस्तानमधील राजा तजम्मुल हुसैन यांनी नुरजहाँ यांना एकदा विचारले होते की, तुमच्या आयुष्यात किती पुरुष येऊन गेले. सुरुवातीला त्यांनी हे उत्तर देणे टाळले होते. पण तजम्मुल यांनी जोर दिल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, आतापर्यंत 16. त्यांच्या या उत्तराची चांगलीच चर्चा झाली होती. एवढंच नव्हे तर नूरजहाँ आणि एक क्रिकेटरच्या अफेअरची देखील चांगलीच चर्चा त्या काळात रंगली होती. 

पाकिस्तानमधील प्रसिद्ध क्रिकेटर नजर मोहम्मद यांचे आणि नूरजहाँचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, एकदा नूरजहाँ आणि नजर मोहोम्मद यांना नुरजहाँच्या पतीने रंगेहात एका रूममध्ये पकडले होते. नूरजहाँ यांच्या पतीला पाहाताच नजरने खिडकीमधून खाली उडी मारली होती. त्यात त्यांच्या हाताला चांगलीच दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्यांचे क्रिकेट करियर लवकर संपुष्टात आले.  

टॅग्स :बॉलिवूड