निशिकांत होणार ‘खलनायक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:51 IST
निर्माता निशिकांत कामत हे चक्क त्यांच्या आगामी चित्रपट ‘रॉकी हँण्डसम’मध्ये ‘खलनायक’च्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. निशिकांत यांनी स्वत:च्याच चित्रपटात ...
निशिकांत होणार ‘खलनायक’
निर्माता निशिकांत कामत हे चक्क त्यांच्या आगामी चित्रपट ‘रॉकी हँण्डसम’मध्ये ‘खलनायक’च्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. निशिकांत यांनी स्वत:च्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे, हे ठरविण्याआगोदरच त्यांनी ती भूमिका केली आहे हेच मान्य करणे यातच शहाणपणा आहे. ते म्हणतात,‘ खरंतर माझा एक मित्र खलनायकचा भूमिका साकारणार होता; मात्र, त्याने फारच थंड प्रतिक्रियेत अभिनयाला सुरूवात केली. त्यामुळे मी ही भूमिका स्वत:च करायचा निर्णय घेतला.