निर्भयाचा आरोपी सुटला; फरहान निराश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:51 IST
संपूर्ण देशात एक नवी चळवळ उभे करणारे प्रकरण म्हणून निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीची सुटका झाल्यामुळे फरहान अख्तर निराश झाला ...
निर्भयाचा आरोपी सुटला; फरहान निराश
संपूर्ण देशात एक नवी चळवळ उभे करणारे प्रकरण म्हणून निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीची सुटका झाल्यामुळे फरहान अख्तर निराश झाला आहे. तो म्हणतो, अखेर 'निर्भया'चा आरोपी सुटला. आरोपी सुटू नये म्हणून विविध स्तरांवरून विरोध करण्यात आला. तरी कायद्यापुढे काहीही चालले नाही. आरोपी सुटल्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी बॉलिवूड मात्र शांत शांतच राहिले. कसली प्रतिक्रिया नाही की कसला विरोध नाही. फरहान अख्तर 'एमएआरडी' नावाची मोहीम चालवतो. त्याने आरोपीच्या सुटकेविरोधात दु:ख व्यक्त केले. त्याने विनम्रपणे न्यायलयाला विनंती केली आहे की, या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी न्यायालयानेच पावले उचलण्याची गरज आहे.