Join us  

फील्ड मार्शल सैम मानेकशॉ बायोपिकचा दुसरा लूक आला समोर, मुख्य भूमिकेत झळकणार हा अभिनेता, तुम्ही त्याला ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 4:54 PM

फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथिनिमित्त सिनेमाचा दुसरा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.यात विकी कौशल हुबेहूब मानेकशॉ यांच्यासारखा दिसत आहे.

बॉलीवुडमध्ये आजवर विविध बायोपिक आले.या बायोपिक सिनेमातून त्या त्या व्यक्तीचा जीवन संघर्ष रसिकांनी रुपेरी पडद्यावर पाहिला. या बायोपिक सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. आता आणखी एक बहुप्रतिक्षित बायोपिक रसिकांच्या भेटीला येत आहे.  देशातील पहिले फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्यात येणार आहे. 

'द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या सुपर हिट सिनेमातील विकीच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात त्याने भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारल्यानंतर आता देशातील पहिले फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. या बायोपिकचं नाव सैम असं आहे. सैम बायोपिकमधील विकी कौशलचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. 

फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथिनिमित्त सिनेमाचा दुसरा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.यात तो हुबेहूब मानेकशॉ यांच्यासारखा दिसतोय. या बायोपिकचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. या चित्रपटावर सध्या विकी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तो प्रचंड तयार करत आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहे.

टॅग्स :विकी कौशल