नेटफ्लिक्सने केला किंग खानशी ‘स्पेशल’ करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 10:22 IST
शाहरुख खान म्हणजे ग्लोबल सुपरस्टार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आॅनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस ‘नेटफ्लिक्स’ने किंग खानच्या ‘रेड ...
नेटफ्लिक्सने केला किंग खानशी ‘स्पेशल’ करार
शाहरुख खान म्हणजे ग्लोबल सुपरस्टार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आॅनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिस ‘नेटफ्लिक्स’ने किंग खानच्या ‘रेड चिली एंटरटेंनमेंट’सोबत (आरसीई) एक स्पेशल करार केला असून त्यानुसार येथून पुढे शाहरुख स्टारर फिल्म्स ‘नेटफ्लिक्स’वर एक्सक्लुझिव्हली उपलब्ध होणार आहेत.शाहरुख प्रमुख असलेल्या रेड चिलीशी करार केल्यामुळे भारतातील आणि विदेशातील यूजर्सना नेटफ्लिक्सवर ‘व्हिडिओ आॅन डिमांड’ तत्वावर ‘आरसीई’ निर्मित चित्रपट पाहता येतील. शाहरुखची लेटेस्ट फिल्म ‘डिअर जिंदगी’ सर्वप्रथम या आॅनलाईन स्ट्रिमिंग सर्व्हिसवर दाखवली जाणार आहे.कराराअंतर्गत शाहरुखच्या कंपनीने आगामी तीन वर्षात प्रोड्युस केलेल्या सर्व चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध होतील. म्हणजे तुम्ही हवे तेव्हा ‘हॅपी न्यू इयर’, ‘दिलवाले’ आणि ‘ओम शांती ओम’ यासह अनेक चित्रपट कायदेशीररीत्या आॅनलाईन पाहू शकता.विशेष म्हणजे नेटफ्लिक्सची प्रतिस्पर्धी कंपनी ‘अॅमेझॉन’ने त्यांची आॅनलाईन स्ट्रिमिंग सर्व्हिस ‘प्राईम व्हिडिओ’ भारतात बुधवारी (दि. १४) लाँच केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कंपनीने रेड चिलीसोबत कराराची घोषणा केली. अॅमेझॉनने यशराज फिल्म्स, धर्मा प्रोडक्शन्स, टी-सिरीजसह अनेक प्रोडक्शन कंपन्यांशी करार केला आहे. तसेच आगामी काळात १७ ओरिजिनल भारतीय शो तयार करण्याची त्यांची योजना आहे. नेटफ्लिक्स : शाहरुख खाननेटफ्लिक्सचे मुख्य कंटेट आॅफिसर टेड सेरॅन्डोस म्हणाले की, शाहरुख खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर नेण्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे. चाहत्यांनी त्याला प्रेमाने दिलेले ‘किंग खान’ हे नाव त्याची जादू दर्शवते. तो एक ‘कल्चरल आयकॉन’ आणि संपूर्ण जगात अफाट लोकप्रियता मिळवलेला कलाकार असल्यामुळे त्याच्यासोबत हा करार करणे आमच्यासाठी खास आहे.यामुळे केवळ नेटफ्लिक्सलाच नाही तर शाहरुखलाही फायदा होणार आहे. जगभरात कंपनीचे ८.६ कोटी यूजर्स आहेत. आपला प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी त्याला या करारामुळे लाभ होणार आहे. मेनस्ट्रीम ब्लॉकबस्टर फिल्म दाखवण्याबरोबरच नेटफ्लिक्स काही इंडिपेंडेंट व स्मॉल बजेट चित्रपटांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.