Join us

ना रणबीर, ना रश्मिका, 'अ‍ॅनिमल'मधून फळफळलं या कलाकाराचं नशीब, रातोरात झाला स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 09:52 IST

Animal Movie : रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अ‍ॅनिमल सिनेमाने ६ दिवसात ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अ‍ॅनिमल सिनेमाने ६ दिवसात ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच चित्रपटातील ‘अर्जन व्हॅली’ हे गाणेही खूप गाजले. चित्रपटाच्या सीनपासून ते डायलॉग्स आणि अ‍ॅक्शनपर्यंत बरीच चर्चा आहे. या गाण्याने एका कलाकाराचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. हा स्टार ना रणबीर कपूर आहे ना रश्मिका मंदान्ना. अर्जन व्हॅलीला आपल्या सुरेल आवाजाने सजवणारा पंजाबी गायक भूपिंदर बब्बल रातोरात स्टार झाला आहे.

अर्जन व्हॅली हे गाणे आपल्या आवाजाने सजवणारे गायक भूपिंदर बब्बल यांनी याआधीही अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पण या आधी या गायकाचा आवाज फार कमी लोकांना माहीत होता. आता 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील गाण्याला आवाज दिल्यानंतर हा गायक रातोरात स्टार झाला आहे. भूपिंदर बब्बल यांच्या मैफलीही अचानक वाढू लागल्या आहेत. एवढेच नाही तर अर्जन व्हॅली हे गाणे सुपरहिट झाल्यानंतर भूपिंदर बब्बल मुंबईसह देशभरातील शहरांमध्ये आपले शोज करत आहेत. नुकतेच मुंबईत भूपिंदर बब्बलच्या कॉन्सर्टला प्रचंड गर्दी जमली होती. एवढेच नाही तर नुकतेच भूपिंदर बब्बल यांनाही विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्थेत दिसले.

अर्जन व्हॅली गाणे आहे इतिहासाशी निगडीत 'अ‍ॅनिमल'मधील अर्जन व्हॅली हे गाणे खूप खास आहे आणि ते खूप चर्चेत आहे. हे गाणे इतिहासाच्या पानांवरून उचलून या चित्रपटात समाविष्ट करण्यात आले आहे. या गाण्यामागील कथा अशी आहे की हे गाणे शीख पंथातील महान योद्ध्यांमध्ये गणले जाणारे हरिसिंग नलवा यांच्या मुलावर लिहिले गेले होते. युद्धातील शौर्य दाखवणाऱ्या गाण्याच्या ओळी हरिसिंह यांचा मुलगा अर्जन व्हॅली याला समर्पित करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून हे गाणे शीख सैन्याने अनेक युद्धांमध्ये वापरले. आता हे गाणे अ‍ॅनिमलमध्ये दिसल्यानंतर ते गायलेला गायक भूपिंदर बब्बल रातोरात स्टार झाला आहे.

टॅग्स :रणबीर कपूररश्मिका मंदाना