Join us  

Confirm: नेहा कक्करची लग्न पत्रिका इंटरनेटवर व्हायरल, या तारखेला अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:50 PM

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे कार्ड फॅन क्लबने शेअर केले आहे. व्हायरल झालेल्या वेडिंग कार्डमध्ये 26 ऑक्टोबर 2020 रोजी नेहा आणि रोहनप्रीत लग्नबंधनात अडकणार आहेत.

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग  रेशीमगाठीत अडकत आहेत. दोघं जन्मोजन्मी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणार आहेत. दोघांच्या लग्नाकडे फॅन्स आणि बॉलीवुडसह अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान यांच्या लग्नाचे कार्ड इंटरनेटवर व्हायरल होत आहे.आतापर्यंतच्या केवळ अफवाच समजले जाणारे 

या लग्नाची तारिखही समोर आली आहे. नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे कार्ड फॅन क्लबने शेअर केले आहे. व्हायरल झालेल्या वेडिंग कार्डमध्ये  26 ऑक्टोबर 2020 रोजी नेहा आणि रोहनप्रीत लग्नबंधनात अडकणार आहेत. पंजाबमध्येच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्न करत असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. विशेष म्हणजे या दोघांनीही आतापर्यंत त्यांचे सोबतचे एकही  फोटो  शेअर केले नव्हते. अशातच ही आनंदाची बातमी मिळताच त्याचे चाहते उत्साहित आहेत. या दोघांनी अद्याप त्यांच्या लग्नाचा प्लान सांगितलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चा जोर धरत असतानाच आता वेडिंग कार्ड व्हायरल झाल्यामुळे या अफवा नसून लग्नाची बातमी खरी असल्याचे बोलले जात आहे. 

तसेच काही दिवसांपूर्वीच नेहा आणि रोहनप्रीत यांचे नवीन गाणे रसिकांच्या भेटीला येणार असल्यामुळे त्यांच्या लग्नाच्या बातम्या या पब्लिसिटी स्टंट असल्याचेही बोलले गेले. रसिकांचे लक्ष आकर्षिक करून घेण्यासाठी  लग्न करणार असल्याचे सांगत प्रमोशन करत असल्याच्याही चर्चा आहेत. दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांकडूनही तर्कवितर्क लावले जात आहेत.  याशिवाय बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सही या दोघांबाबत कन्फुज्ड होते.

आता लग्नाचे कार्ड समोर आल्यामुळे लग्नाची तारीख आणि स्थळ या दोन्ही गोष्टी समोर आल्या आहेत, त्यामुळे ही अफवा नसून त्यांच्या लग्नाची बातमी  खरी असल्याचा स्पष्ट झाले आहे.  नेहा आणि रोहनप्रीत खरोखरच लग्न करणार आहेत. वेडिंग कार्डनुसार या दोघांचे लग्न दिल्लीमध्ये होणार असून पंजाबमध्ये रिसेप्शन होणार आहे.

नेहा कक्कर म्हणाली, तू माझा आहेस...; अखेर नेहूप्रीतने दिली प्रेमाची कबुली

नेहानेच सोशल मीडियावर एक गोड फोटो आणि एका गोड कॅप्शनसह या प्रेमावर शिक्कामोर्तब केले होते. नेहाने रोहनप्रीतसोबतचा एक फोटो शेअर केला. ‘तू माझा आहेस...,’ असे या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले. सोबत ‘नेहूप्रीत’ असा हॅशटॅगही दिला. सध्या नेहूप्रीतचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेहाच्या या पोस्टवर रोहनप्रीतनेही कमेंट केली होती.‘बाबू, आय लव्ह यू सो मच, मेरा पुत, मेरी जान... हो मी फक्त तुझाच आहे,’ असे त्याने लिहिले आणि सोबत खूप सारे हार्टइमोजीही पोस्ट केले होते.

टॅग्स :नेहा कक्कर