Join us  

कन्फर्म! विद्युत जामवालने नंदितासोबत उरकला साखरपुडा, नेहा धूपियाने दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 10:36 AM

कालपरवाच अभिनेता विद्युत जामवाल व नंदिताचे ताजमहाल समोरचे फोटो समोर आले होते. यानंतर विद्युत व नंदिताने साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली होती.

ठळक मुद्देविद्युत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते त्याला फॉलो करतात.

कालपरवाच अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) व फॅशन डिझाईनर नंदिता मेहतानी (Nandita Mahtani) यांचे ताजमहाल समोरचे फोटो समोर आले होते. यानंतर विद्युत व नंदिताने साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली होती. आता साखरपुड्याची बातमी कन्फर्म झाली आहे. अभिनेत्री नेहा धूपियाने ही बातमी कन्फर्म केली आहे.ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांआधीच विद्युत व नंदिताचा साखरपुडा झाला. नेहाने दोघांनाही साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 5 महिन्यांआधी नंदिता विद्युतच्या प्रेमात पडली आणि दोघांनी साखरपुडाही उरकला. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचेही कळते.

ताजमहालच्या समोर काढलेल्या फोटोत विद्युतने नंदिताचा हात पकडलेला आहे आणि नंदिताच्या हातात हिºयाची अंगठी दिसत आहे. या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.नंदिता माहतानी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांसाठी काम केले आहे.  विशेष म्हणजे, नंदिता ही करिश्मा कपूरचा एक्स- हसबण्ड संजय कपूरची पहिली पत्नी आहे.  नंदिताला घटस्फोट दिल्यानंतर संजयने करिश्माशी लग्न केले. संजय कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर नंदिता काळी काळ अभिनेता डिनो मोरियासोबतही रिलेशनशिपमध्ये होती. मात्र कालांतराने त्यांचा ब्रेकअप झाला.

बॉलिवूडमध्ये विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वत: स्टंट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो. विद्युतही आधी मोना सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2 वर्षे दोघांचे अफेअर सुरू होते. विद्युतशी घटस्फोट झाल्यानंतर मोनाने बिझनेसमॅन श्याम गोपालनसोबत लग्न केले.विद्युत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते त्याला फॉलो करतात. सध्या तो त्याच्या  ‘खुदा हाफिज’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

टॅग्स :विद्युत जामवालनेहा धुपिया